अकलूजमध्ये पीआरपीच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, May 9, 2020

अकलूजमध्ये पीआरपीच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

अकलूजमध्ये पीआरपीच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप



अकलूज (प्रतिनिधी) पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या वतीने अकलूज मधील इंदिरा घरकुल व व्यंकटराव माने पाटिलनगर मधील गोरगरीब लोकांना जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप उपविभागीय अधिकारी शमा पवार,तहसिलदार अभिजीत पाटिल,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते,मेडिकल कौन्सिलचे राज्य उपाध्यक्ष डॉ.संतोष खडतरे,अकलूज ग्रामिण रुग्नालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.खडतरे मॅडम,मंडल अधिकारी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
देशात व राज्यात कोरोना या साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र शासनाने संपूर्ण देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन जाहिर केले आहे. त्यामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद असल्याने मोलमजुरी करून उपजिवीका करणाऱ्या कुटुंबांची मोठ्या प्रमाणावर उपासमार सुरु होती. सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अकलूज मधील इंदिरा घरकुल,व्यंकटराव माने पाटिल-नगर येथील १०० कुटुंबांना सोशल डिस्टनसिंग पाळून या जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे वाटप केले.या जिवनावश्यक वस्तुंच्या एका किट मधे गहु तीन किलो,तांदूळ तीन किलो,गोडतेल अर्धा किलो,साखर एक किलो,हरभरा डाळ एक किलो,मिठ एक किलो,लाईफ़बॉय साबण,व्हिल साबण यांचा समावेश होता.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष बॉबी वाघमारे,गुरु गायकवाड,तालुका कार्याध्यक्ष अमित जवंजाळ,युवक तालुका कार्याध्यक्ष सचिन कांबळे,अकलूज शहर अध्यक्ष मिलिंद पवार,शिवाजी खडतरे,वंदे मातरम् गणेश उत्सव मंडळाचे गणेश अनपट,निलेश ठोम्बरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages