सोलापूर शहरांतील दवाखान्यांची भरारी पथकातर्फे तपासणी
सोलापूर– जिल्हा प्रशासनातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने आज शहरातील 26 दवाखान्यांची तपासणी केली. पैकी केवळ एक दवाखाना बंद आढळला हा दवाखाना गेली सहा महिने बंद असल्याचे भरारी पथकाने कळविलेआहे,अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.
शहरातील दवाखाने बंद असल्यामुळे सिव्हील हॉस्पीटलवर ताण येत असल्याचे जाणवत आहे.त्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी इंडियन मेडिकल असोसिऐशनच्या पदाधिका-यांशी वारंवार चर्चा केल्या. त्यानुसार इंडियन मेडिकल असोसिऐशनच्या पदाधिका-यांनी सुरु असलेल्या दवाखान्यांची यादी प्रशासनास सादर केली होती. मात्र तरीही रुग्ण् सेवा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. यासाठी प्रशासनातर्फे आज भ्रारी पथक नियुक्त करण्यात आले. या पथकास आज शहरातील 25 दवाखाने आणि नर्सिंग होम सुरु आढळले.विजापूररोड येथील शोभा हॉस्पिटल बंद आढळले. आज चौकशी केली असता हे हॉस्पीटल सहा महिन्यापासून बंद असून तेथील डॉक्टर चिराग हॉस्पीटल येथे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागरिकांनी रुग्णसेवेबाबत काही तक्रार असल्यास जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष येथील 18002335044 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. शहरातील सुरू असलेले दवाखाने आणि त्यांच्या वेळा याबाबत या क्रमांकावर माहिती मिळेल, असे त्यांनी सांगितले.
0 Comments