टेंभुर्णी शहरात चैन स्नॅचिंग ; एक तोळ्याचे गंठण पळविले
टेंभुर्णी [ प्रतिनिधी ] टेंभुर्णी शहरात चैन स्नॅचिंगची घटना घडली असून मोटारसायकल वरून आलेल्या अज्ञात दोन तरुणांनी महिलेच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाचे गंठन हिसका मारून जबरदस्तीने तोडून नेले आहे.ही घटना २६ मे रोजी सायं.५.३० वा. सुमारास भवानी नगर मध्ये घडली.
याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,भवानी नगर येथे राहणाऱ्या संगिता शामराव लोंढे या दि.२६ मे रोजी भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या.त्या ५.३० वा. सुमारास घरी परतत असताना भवानी नगर भागात समोरून मोटारसायकल वरून आलेल्या पैकी मागे बसलेल्या तरुणाने अचानक त्यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम सोन्याचे गंठन जबरदस्तीने हिसका मारून पळवून नेले.
याबाबत अज्ञात दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहेकॉ शिवाजी भोसले हे अधिक तपास करीत आहेत.
0 Comments