Hot Posts

6/recent/ticker-posts

माळशिरस तालुक्यातील कोरोना शिरकावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माळशिरस तालुक्यातील कोरोना  शिरकावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


अकलूज( प्रतिनिधी) माळशिरस तालुक्यातील मौजे संग्रामनगर येथे कोरोनाचे दोन रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.तर घाबरू नका, अफवा पसरवू , नका पण अति सतर्क राहा असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
           महाभयानक अशा प्राणघातक कोरोना सारख्या क्रुर विषाणूने जगाच्या पाठीवर थैमान घातले असून कित्येकांचे जीवन त्याने उद्ध्वस्त केले आहे. आपल्या देशातही राक्षसरुपी कोरोनाचा शिरकाव पाहता चौथा लॉक डाऊन सुरू आहे. कोरोना सारख्या संकटावर मात करण्यासाठी आपले शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर यंत्रणा,पोलिस यंत्रणा ,स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व प्रकारची उपाययोजना करीत आहेत तर सर्व प्रकारे मदतीचा हात देत आहेत. काळजी घ्या, मीच माझा रक्षक, सतर्क राहा, घराबाहेर पडू नका, मास्क वापरा, सतत हात स्वच्छ धुत रहा, एकमेकांच्या संपर्कात येऊ नका, जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना सुरक्षित अंतर ठेवा, हे सतत शासन प्रशासन आपल्या हितासाठी, आपल्या काळजीपोटी, समाजाच्या हितासाठी, वारंवार सांगत आहे. असे असताना वरील दोन रूग्णांनी सर्व प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करीत वैराग येथील एका संशयित आणि संक्रमित रुग्णाच्या संपर्कात जाऊन आले. सदरची बाब अतिशय चिंतेची आणि गंभीर म्हणावी लागेल.
         कारण माळशिरस तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. वर्षानुवर्ष दुष्काळाचे महासंकट तालुक्यावर येत असते. इथली तमाम जनतेचे पोट हातावरचे असून काहींना भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागते. वर्षानूवर्ष दुष्काळाच्या संकटात होरपळनाऱ्या माळशिरस तालुक्यात आज कोरोना सारख्या महाभयंकर संकटाने शिरगाव केला आहे. आणि याला जबाबदार वरील दोन रुग्णच म्हणावे लागेल?तुमच्याकडे कितीही पैसा आणि पावर आहे हे कोरोना पहात नाही.हे सांगण्याची गरज नाही.! तुम्ही कोणीही असो तो तुमच्या पर्यंत येत नाही?तर तुम्ही त्याच्या पर्यंत जाऊन समाजाचे आरोग्य धोक्यात आणत आहे . म्हणून सतर्क राहा सुखी रहा नियमाचे पालन करा..!
Reactions

Post a Comment

0 Comments