Hot Posts

6/recent/ticker-posts

फी वाढ करणार्‍या शाळेवर कारवाई करा-संभाजी ब्रिगेड ची मागणी

फी वाढ करणार्‍या शाळेवर कारवाई करा-संभाजी ब्रिगेड ची मागणी 



सोलापूर (प्रतिनिधी)- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात कोणत्याही शाळेने शाळांची फी वाढ करू नये असा शासनाने 8 मे रोजी आदेश काढलेले असताना या आदेशास केराची टोपली दाखवत सोलापुरातील काही शाळा 20 ते 30 % फी वाढ करून पालकांची आर्थिक लूट करीत आहेत अश्या शाळेवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड सोलापूर सामाजिक संघटनेच्या वतीने संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ईमेल द्वारे करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसला आहे. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काहींची वेतन कपात झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या घरचं आर्थिक गणित बिघडलं आहे. अशा कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर याचा परिणाम होऊ नये, यासाठी यंदाच्या वर्षी शाळांनी फी वाढ करू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा  बर्‍याच शाळा 10 टक्के ते 30 टक्केपर्यंत तर काही शाळा त्याहून अधिक फी वाढ करत आहेत किंवा लागू करीत आहे,  मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करुन शाळेमध्ये फी वाढ लागू केली जात आहे. तर काही शाळा चार हप्त्यात फी भरण्यासाठी सवलत देत असून त्यासाठी एक हजार रुपये अतिरिक्त फी घेत आहेत. तसेच मोठ्या शिशूतील विद्यार्थ्यांना जास्त फी आकारुन पहिलीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेण्यास सांगितले जाते आहे, ही अत्यंत अन्यायकारक बाब असून उलट फीमध्ये कमीतकमी 10 ते 20 टक्के सूट द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड सोलापूर च्या वतीने करण्यात आली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments