जनसेवा संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराने १००० रक्तदानाचा टप्पा पूर्ण केला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 11, 2020

जनसेवा संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराने १००० रक्तदानाचा टप्पा पूर्ण केला

जनसेवा संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या  रक्तदान शिबीराने १००० रक्तदानाचा टप्पा पूर्ण केला


अकलूज ( प्रतिनिधी )  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने  संघटनेचे नेते डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. स्वःता डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी रक्तदान करून शिबीराची सुरवात केली होती.सदर शिबिरात संघटनेचे १००० कार्यकर्त्यांनी रक्तदान करून  या राष्ट्रीय आपत्ती मध्ये सहभाग नोंदवला. तर रक्तदान शिबीरात सौ.उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी  स्वतः१००१ वे रक्तदान करून शिबिराचा समारोप केला.                              या कार्यक्रमासाठी डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील  प्रांताधिकारी श्रीमती शमा पवार , अकलुज विभाग  डीवायएसपी  निरज राजगुरु, माळशिरस तालुक्याचे तहसीलदार अभिजीत पाटील अकलुज ,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.रामचंद्र मोहिते, उपजिल्हा रूग्णालय अकलुजच्या अधिक्षक डाॅ.सुप्रीया खडतरे, ब्लड बॅंकेचे डाॅ. बाहुबली दोशी, डाॅ.संतोष खडतरे,  यांचे सह जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ,उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, युवक अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, शंकरराव मोहिते पाटील बॅंकेचे चेअरमन सतिश नाना पालकर सरचिटणीस  दत्ता जाधव, अकलुज शहर अध्यक्ष  गणेश काका महाडीक, शाहीर राजेंद्र कांबळे, रणजीतसिंह देशमुख ,दादा जाधव, जोतीताई कुंभार,योगीता देशमुख  रूपाली गांधी, डाॅ.कदम, सचिन गायकवाड, सागर देशमुख  नंदा साठे, स्वराली पालकर ,सुषमा निकम, नंदा लोखंडे ,राजश्री कनाळ, कविता कनाळ, गीता बिराजदार, श्रुती नालवर, माधुरी वाघमारे, मीनल साठे जिल्हा सरचिटणीस सुधीर रास्ते,युवक जिल्हा सरचिटणीस मयुर माने,व पदाधिकारी उपस्थित होते.     

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages