Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्याच्या जावयाने आणला सासूरवाडीत कोरोना; माढा तालुक्यात एन्ट्री

पुण्याच्या जावयाने आणला सासूरवाडीत कोरोना; माढा तालुक्यात एन्ट्री


टेंभुर्णी [प्रतिनिधी ] : मुंबई , पुणे , सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसने अखेर माढा तालुक्यातील सोलापूर पुणे हायवेवरील टेंभुर्णी जवळ असणा-या वरवडे ता.माढा  गावात एन्ट्री केली  आहे. आजपर्यंत कोरोनाबाबतीत निरंक असलेल्या माढा तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रवेश केल्याने तालुकावासियांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. पलंगे व त्यांच्या टीमने गावात जाऊन सर्व्हे केला असून कोरोनाबाधित रूग्णासह संपर्कातील पत्नी व मुलाला सोलापूरला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना गावातील वस्तीवर होमक्वारंन्टाईन केले आहे.

दिलेल्या माहितीनुसार वरवडे गावचा जावई असणारा व चाकण एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या 52 वर्षीय व्यक्तीला 17 मे रोजी पॅरालिसीसचा आजार झाला. तो चाकण (जि. पुणे) येथे उपचारासाठी दाखल झाला. उपचारानंतर 24 मे रोजी त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर तो अॅम्बुलन्समध्ये पुण्याहून वरवडे येथे त्याच दिवशी आला. आल्यानंतर त्याला आरोग्य प्रशासनाने होमक्वारंन्टाईन केले. मात्र उपचारादरम्यान घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याची पुणे जिल्ह्यातील एका खाजगी न्यूज चॅनेलवरती बातमी आली. यामध्ये माढा नावाचा उल्लेख असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली.

दरम्यान फक्त माढा असा उल्लेख असल्याने संपूर्ण माढाशहरवासिय भयभीत झाले होते. यादरम्यान माढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद व्हनकळस यांनी फोन ईमेल द्वारे अधिक माहिती मिळवली असता संबधित रूग्ण हा वरवडे येथील असल्याचे समोर आले.

होम क्वारंन्टाईन हा प्रकार फारसा गांभीर्याने लोकांनी घेतलेला दिसत नसल्याने आणि या लोकांवर कोणाचीही निगराणी नसल्याने कोरोनाचा फैलाव  वाढल्याची भिती प्रशासनाने केली आहे हा पहीलाच रुग्ण आसल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.
Reactions

Post a Comment

1 Comments