Hot Posts

6/recent/ticker-posts

क्वारंटाईन तरुणाकडून वृक्षसंवर्धन : तुळशी ग्रामस्थांकडून कौतुक


क्वारंटाईन तरुणाकडून वृक्षसंवर्धन : तुळशी ग्रामस्थांकडून कौतुक


मोडनिंब- क्वारंटाईन काळात  तरुणाने स्वतःहून वृक्षसंवर्धन केले. या तरुणाचे तुळशी ग्रामस्थांनी कौतुक केले.
हनुमंत नवनाथ आवटे (वय ३०) या खासगी बसचालकाने तुळशी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये  क्वारंटाईन  झाल्यानंतर१४ दिवसांमध्ये वृक्ष संवर्धनाची मोहीम हाती घेतली. आणि ३० ते ३५ विविध वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी पार पाडली. यासाठी लांबून माती आणली, सर्व झाडांना आळी केली, व पाणी दिले.
बस चालक आवटे या तरुणाने लॉक डाऊन च्या काळात नागरिकांना बिहार मध्ये सोडण्याचे काम केले होते. बिहार होऊन आल्यानंतर त्याने गावा प्रवेश न करता गावापासून अर्धा किलोमीटर असलेल्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात थांबूनच ग्रामस्थांना कळवले.
स्वतः  क्वारंटाईन झाला. तब्बल चौदा दिवसात काय करायचे म्हणून  स्वयंप्रेरणेने त्याने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घेतली. ऐन उन्हाळ्यामध्ये या तरुणाने वृक्षसंवर्धन केल्यामुळे सुमारे दीडशे च्या आसपास  झाडे सध्या हिरवीगार झाली असून त्यांचे चांगले जतन झाले आहे. चिंच,वड, करंज, लिंबू पिंपळ या सर्व झाडांचे चांगल्या प्रकारे जतन झाले आहे.
कोरोना ला न घाबरता, मनाने खचून न जाता या तरूणाने वृक्षसंवर्धनाचे विशेष कामगिरी केल्याबद्दल गावचे सरपंच दिगंबर (मामा) माळी, उपसरपंच डॉ. शरद मोरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एन. इंगळे यासह ग्रामस्थांनी हनुमंत चे कौतुक केले.
Reactions

Post a Comment

0 Comments