Hot Posts

6/recent/ticker-posts

मोडनिंब च्या नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग मशिनद्वारे होणार तपासणी : सरपंच दत्तात्रय सुर्वे


मोडनिंब च्या नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग मशिनद्वारे होणार तपासणी : सरपंच दत्तात्रय सुर्वे


मोडनिंब, प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोडनिंब येथील नागरिकांची  थर्मल स्क्रिनिंग मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती सरपंच दत्तात्रय सुर्वे यांनी दिली.
मोडनिंब येथील आरोग्यवर्धिनी मध्ये सरपंच दत्तात्रय सुर्वे यांच्या हस्ते पाच थर्मल स्क्रीनिंग मशीनचे वाटप करण्यात आले . यावेळी थर्मल स्क्रीनिंग मशीन चे प्रशिक्षण देण्यात आले. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी सर्व आशा वर्कर्स, पोलीस कर्मचारी, तसेच पत्रकार बांधव,अंगणवाडीसेविका यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्यवर्धिनी च्या वतीने वैद्यकीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी केले. मोडनिंब येथे पुणे मुंबई व अन्य ठिकाणाहून शेकडो नागरिक आले आहेत.या नागरिकांसह संपूर्ण मोडनिंब मधील नागरिकाचे वार्ड निहाय थर्मल स्क्रीनिंग तपासणी करण्यात येणार आहे. सरपंच दत्तात्रय सुर्वे, अनिल शिंदे, सदाशिव पाटोळे, पुणे स्कोडा होलक्स वॅगन कंपनी मधील व्यवस्थापक बाळकृष्ण चोपडे, आसिफ आतार यांच्यासह आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी संतोष पुरवत यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments