Hot Posts

6/recent/ticker-posts

स्कोडा कंपनीच्या वतीने फेस शील्ड चे वाटप : बाळकृष्ण चोपडे


स्कोडा   कंपनीच्या वतीने   फेस शील्ड चे वाटप : बाळकृष्ण चोपडे



मोडनिंब प्रतिनिधी  :  कोरोना च्या पार्श्वभूमीवर  स्कोडा  कंपनीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात मोडनिंब टेंभुर्णी एमआयडिसी सोलापूर येथे सुमारे 1000 फेस शील्ड  चे वाटप करण्यात आले अशी माहिती कंपनीच्या व्यवस्थापक बाळकृष्ण चोपडे यांनी दिली.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनीच्या वतीने फेस शील्ड चे वाटप करण्यात येत आहे अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापक श्री चोपडे यांनी दिली.  सरपंच दत्तात्रय सुर्वे यांच्या हस्ते  फेटा बांधून चोपडे यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूर येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत वरील पोलीस निरीक्षक पाटील यांच्या हस्ते पोलीस पोलीस मित्र कर्मचाऱ्यांना फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले.
मोडनिंब येथे आरोग्य वर्धिनी चे वैद्यकीय अधिकारी प्रदीप पाटील, सरपंच दत्तात्रय सुर्वे यांच्या हस्ते आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी, पत्रकार बांधव यांना  फेस शील्ड चे वाटप करण्यात आले. टेंभूर्णी येथील पोलीस कर्मचारी यांनाही टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये फेस शील्ड  चे वाटप करण्यात आले. अशी माहिती यावेळी श्री चोपडे यांनी दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments