लोकराजा छ. शाहू फौंडेशनच्या वतीने खिलारवाडी येथे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप-संस्थापक अध्यक्ष अभिषेक कांबळे
सांगोला (प्रतिनिधी) सध्या देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.सांगोला तालुका हा परंपरेने दुष्काळी तालुका असून अजूनही गरीब व गरजू लोकांना रोजगार उपलब्ध नाहीत या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करण्याच्या भावनेतून लोकराजा छत्रपती शाहू फाऊंडेशन च्या वतीने खिलारवाडी ता.सांगोला येथील निराधार,विधवा व मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट चे वाटप करण्यात आले.
प्रसंगी सांगोला तालुक्यातील शेतमजूर,कामगार,निराधार,विधवा महिला यांच्या हाताला काम नसल्याने अडचणीत असून व्यावसायिक,नोकरदार व तरुण वर्गाने एकत्रित येऊन गरीब व गरजू लोकांना मदत करावी असे आवाहन लोकराजा छत्रपती शाहू फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.अभिषेक कांबळे यांनी केले.
यावेळी खिलारवाडी गावचे सरपंच कृष्णदेव खांडेकर,उपसरपंच चंद्रकांत बागल,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुखदेव खांडेकर,माजी ग्रा. सदस्य अमर कोळी,युवा नेते उमेश खिलारे,प्रशांत बागल,केशव नाना चव्हाण,राजकुमार भादुले,किरण कांबळे,शैलेश कांबळे,गणेश लोखंडे इ.मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोरोना निवारण समिती चे अध्यक्ष नवलकुमार गाडे यांनी आभार मानले.
0 Comments