जनसेवा संघटनेच्या वतीने चौडेश्वरवाडी येथे रक्तदान शिबीर संपन्न
अकलूज( प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा उद्रेक पहाता रुग्णांना रक्ताची कमकरता भासू नये म्हणून जनसेवा संघटनेचे नेते डाॅ.धवलसिंह मोहीते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून टार्गेट " एक हजार रक्तदान " असा विडा उचलण्यात आला आहे.
प्रथमत: डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी स्वःता रक्तदान करून जनसेवा संघटनेचे सर्व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन, संघटनेचे कार्यकर्ते व जनतेला रक्तदान करणेचे आवाहन केलं होते. या आव्हानास प्रतिसाद देत जनसेवा संघटनेचे एक हजार कार्यकर्त्यांनी रक्तदान करून या राष्ट्रीय आपत्ती मध्ये सहभागी व्हायचे ठरवले आहे. याच अनुशंगाने मंगळवार दिनांक ५ मे रोजी चौडेश्वरवाडी या ठिकाणी रक्तदान शिबीर संपन्न झाले. यामध्ये ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना चौडेश्वरवाडी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती उदयनगर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तरूण मंडळ उदयनगर,छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान चौंडेश्वरवाडी,दोस्ती ग्रूप चौंडेश्वरवाडी,एकता फाऊडेशन उदयनगर, यांचे सयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बँकेचे अजित गांधी, मयूर माने व सर्व कर्मचारी यांनी रक्तसंकलन करण्यासाठी सहकार्य केले. या शिबीराचे आयोजन जनसेवा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष शिवाजीराव इंगवले देशमुख माजी सरपंच धनाजी साखळकर यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आले. चंद्रकांत कोळी ,हुसेन शेख ,सुनील गांधी ,बाबासाहेब रणवरे ,श्रीमंत लांडगे ,मोहम्मद पठाण, मेहबूब आतार ,दत्तात्रय खंडागळे ,समाधान इंगवले- देशमुख, अमर काळे ,समर्थ मिसाळ, प्रवीण इंगवले देशमुख, असलम सय्यद ,हर्षद भोसले, गणेश अंकुशराव, रियाज सय्यद ,अवधूत कांबळे ,सचिन सोनवणे ,विकी गायकवाड शफीक सय्यद,महावीर किरदकर,सागर खंडागले. सोनु मिसाळ.तुषार साठे.रनजित माने ऋषी शिंदेयांनी या शिबीरासाठी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments