Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला शहर हद्दीतील दिव्यांगांना सांगोला नगरपरिषदेचा मदतीचा हात

सांगोला शहर हद्दीतील दिव्यांगांना सांगोला नगरपरिषदेचा मदतीचा हात
82 दिव्यांगांच्या थेट बँक खात्यावर पाठवले पत्येकी 2000 रुपये


सांगोला (प्रतिनिधी) सर्वत्र कोरोना विषाणू चा प्रसार वाढत असून यावर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यशासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला होता. या लॉकडाऊन दरम्यान शहरातील दिव्यांग लोकांच्या उदरनिर्वाहाची निर्माण झालेली समस्या लक्षात घेऊन या व्यक्तींच्या बँक खात्यावर प्रत्येकी 2000 रुपये पाठविण्याचा महत्वाचा निर्णय सांगोला नगरपरिषदेने घेऊन त्याची अंमलबजावणी केल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

लॉकडाऊन मुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या शहर हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत करणेबाबत सांगोला नगरपरिषदेच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांचे एकमत झाले व त्यास अनुसरून वार्षिक अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी राखीव असणाऱ्या निधीमधून प्रत्येकी 2000 रुपये थेट लाभार्त्याच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या आर्थिक मदतीमुळे त्यांना अडचणीच्या काळात मेडिकल,दवाखाना, किराणा मालाची खरेदी या व इतर आवश्यक अशा गरजा पूर्ण करण्यास निश्चितपणे मदत होईल.

एकूण 82 जणांच्या खात्यावर प्रत्येकी 2000 रुपये प्रमाणे एकूण 1 लाख 64 हजार इतक्या रकमेचे वितरण करण्यात आले आहे. या व्यक्तींचे बँक खाते शहरातील 4 बँकांमध्ये असून या दिव्यांग लाभार्त्यांना बँकेतून पैसे काढणे सोयीस्कर व्हावे म्हणून या 4 बँकांच्या व्यवस्थापनास पत्र देऊन बँकेतून पैसे काढण्यास विशिष्ट वेळ ठरवून देण्यास कळविले असल्याची माहिती मुख्यधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments