आधार!विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी.. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना करावी मदत..
सोलापूर प्रतिनिधी-:वाचाल तर वाचाल पण पुस्तकेच नाही तर वाचणार काय?आणि वाचणार कसे?हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूच्या महामारीने सर्व जग लॉकडाऊनमध्ये बंदिस्त झाले आहे.शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरू होणार आणि झालेच तर लॉकडाऊनमुळे नवीन पुस्तकांची छपाई झाली नसल्यामुळे ती विद्यार्थ्यांना मिळण्यास उशीर होणार आहे.
आधार! विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी या संकल्पनेतून शंभूराजे विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नताशा चव्हाण व महिला आघाडी शहराध्यक्ष निकिता दनके यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व पालकांना आवाहन केले आहे की आपल्या पाल्यांची कोणत्याही इयत्ते मधील पुस्तके आमच्याकडे द्यावीत अथवा आम्ही स्वतः आपल्या कडे येऊन घेऊ आणि ही पुस्तके गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत देऊ.
तरी आपणास शंभुराजे युवा संघटनेच्या वतीने आपली भावी पिढी घडविण्यासाठी आवाहान करण्यात येते की या कोरोना महामारीवर मात करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुस्तकरूपी मदत करून या चळवळीचा एक धागा होऊन खालील मोबाईल नंबर वर फोन करून मदत करावी ही विनंती.
विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्षा नताशा चव्हाण 91 68 98 22 99,महिला आघाडी शहराध्यक्ष निकिता दनके 76 20 50 16 ,सोशल मीडिया प्रमुख नितेश माने 98 50 03 62 27 शहराध्यक्ष उस्मान तरन 70 30 11 20 92 अभिजित पवार 99 22 511511 प्रसिद्धीप्रमुख 98 22 36 व 40
0 Comments