कोरोनाच्या लढ्यात लक्ष्मीनगर वासियांचे उत्स्फूर्त रक्तदान
नितीन नरळे मित्रपरिवार व लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीचा रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम
सांगोला (जगन्नाथ साठे) - सध्या देशभर चौथा लॉक डाऊनचे काही दिवस शिल्लक असून दिवसेंदिवस देशात व राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे.कोरोणाच्या संकटात सर्व जनता हतबल झाली असून रक्ताचा तुटवडा जाणवू नये, यासाठी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लक्ष्मीनगर ता- सांगोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन उद्योगपती नितीन नरळे आणि ग्रामपंचायत लक्ष्मीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत लक्ष्मी देवीच्या मंदिरात करण्यात आले होते.
लक्ष्मीनगर वासियांनी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.जवळपास १५१ रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.तत्पुर्वी या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ.चांगुणा नरळे, उपसरपंच धनाजी नरळे, उद्योगपती नितीन नरळे,ग्रामसेवक बाळासाहेब शिंदे,माजी सरपंच बालाजी नरळे, उद्योगपती विजय नरळे,पोलीस पाटील सोमनाथ नरळे, सिद्धेश्वर हिप्परकर गुरुजी,कैलास हिपरकर ,अक्षय ब्लड बँक मिरज चे संचालक संजय सरक आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरास अक्षय ब्लड बँक मिरज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास वीस लिटर पाण्याचा जार भेट देण्यात आला. सदर रक्तदान शिबीर सोशल डिस्टन्स आणि शासनाच्या नियमांचे पालन करून घेण्यात आले.सदर रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पारण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी मुबारक मुलाणी, कुंडलिक जावीर,नितीन नरळे मित्रपरिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments