सर फाउंडेशनचा उपक्रम शिक्षकांसाठी राष्ट्रीय 'टीचर इनोव्हेशन अवार्ड' पुरस्कार स्पर्धेचे आयोजन
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक शाळा झपाट्याने प्रगत होत आहे. शाळेतील शिक्षण प्रक्रिया आनंददायी व सुलभ होण्यासाठी नविन उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येक विद्यार्थी प्रगत होण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने सर फाउंडेशन यांचे मार्फत 'टीचर इनोव्हेशन अवार्ड २०२०' या नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर नवोपक्रमाची निवड केली जाणार आहे.
राज्यातील पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, पर्यवेक्षीय अधिकारी, शिक्षण क्षेत्रात मुक्त काम करणाऱ्या व्यक्ति यांना या स्पर्धेत सहभागी होता येईल.
पूर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण पद्धतीत सुधारणा घडविणे, नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षकांच्या व प्रशासनाच्या माहितीसाठी प्रस्तुत करणे, शिक्षकांना कामात प्रोत्साहन देणे, तसेच शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन-अध्यापन पध्दती यांचा शोध घेणाऱ्या शिक्षक व अधिकाऱ्यांना उत्तेजन देणे व त्यांच्यातील संशोधनवृत्ती वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील हेतु आहे.
नवोपक्रम अहवाल लेखनात नवोपक्रमाचे शीर्षक, नवोपक्रमाची गरज व महत्त्व, नियोजन, प्रत्यक्ष कार्यवाही, निष्कर्ष / फायदे, परिशिष्टे, नवोपक्रमाची सद्यस्थिती या मुद्द्यांचा समावेश असावा. शब्द मर्यादा १००० शब्द असून जास्तीत जास्त तीन फोटोचा वापर करावा. अहवाल १० एमबी पर्यंत पीडीएफ स्वरूपात तयार करून http://www.sirfoundation.
शिक्षकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल बनवितांना तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत तयार करावा. इतर राज्यातील शिक्षक देखील यात सहभागी होऊ शकतात. नवोपक्रम हा शिक्षकांनी स्वत: राबविलेला असावा. नवोपक्रम सादर करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२० आहे.
राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे राजकिरण चव्हाण, सतीश सातपुते, संदीप गुंड नवनाथ शिंदे व अनघा जहागिरदार यांनी केले आहे.
0 Comments