सोलापूर येथे पोलीसांसाठी स्वतंत्र कोरोना रूग्णालयाची उभारणी करावी- डाॅ.धवलसिंह
अकलूज( प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावशक सेवेमधील कर्मचारी डॉक्टर, नर्स, पोलीस, महापालिकेचे कर्मचारी यांनाही होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यासह सोलापूर जिल्ह्यात अनेक पोलिसांचा बळी गेला आहे.
कोरोनाच्या या लढाईत पोलीस विभाग अत्यंत कठिण परस्थितीत प्रामाणिकपणे काम करित आहे महाराष्ट्र शासनही पोलिसांचे पाठीशी ठामपणे उभा आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता व मागील दोन महीन्यात बंदोबस्तावरील पोलिसांना कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झालेली संख्या व सोलापूर मधील एकूण कोरोना रूग्णांची संख्या पाहता मुंबई पुणे प्रमाणे सोलापूर येथेही पोलीसांसाठी कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेस त्या पोलीस व अधिकारी यांना तातडीने उपचार मिळणे साठी स्वतंत्र कोरोना रूग्णालयाची उभारणी ताबडतोब करावी अशी मागणी डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री दत्तामामा भरणे,पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण मनोज पाटील, पोलीस आयुक्त सोलापूर श्री.अंकुश शिंदे यांचेकडे ईमेल द्वारे केली आहे.
0 Comments