सोशल डिस्टन्सींगचे पालन करत विवाह सोहळा संपन्न
अकलूज( प्रतिनिधी) अकलूज येथील बागवान गल्ली येथे राहणारे रफिक लतीबभाई बागवान यांची कन्या व सातारा येथील रहिवासी असणारे सलीमभाई अ अजीज बागवान (रि.फाॅरेस्ट आॅफीसर) यांचे चिरंजीव यांचा विवाह अकलूज शहर बागवान समाजाच्या जामा मशीदे मध्ये पार पडला.
लाॅकडाऊन च्या दरम्यान हा विवाह सोहळा होत असल्या कारणाने वर व वधू मंडळी कडून सोशल डिस्टन्सींग चे तंतोतंत पालन करत अगदी कमी वेळेत व कमी खर्चात योग्य नियोजन करून हा सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्या साठी अकलूज ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप, जावेद बागवान अॅड वजीर शेख व गौस बागवान उपस्थित होते.
वाढती महागाई व जगावर येणार्या कोरोना सारख्या संकटामुळे असे विवाह एक काळाची गरज आहे याचे उत्तम उदाहरण बागवान समाजातील या दोन्ही कडील मंडळींकडून समाजाला दाखवून देण्यात आले. हा विवाह सोहळा पार पडण्यासाठी नाजीम खान, आमीर मोहोळकर,व राहत फ्रुट कंपनी यांनी परिश्रम घेतले...
0 Comments