यलमार मंगेवाडी येथील नागरिकांच्या आरोग्याचा होत आहे दररोज सर्वे
नागरिकांनी घरातच रहावे--सरपंच मासाळ
सांगोला (जगन्नाथ साठे ) सध्या कोरोना हा विषाणू सर्वत्र थैमान घालत असून या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असून सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी या गावात ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामनियंत्रण समितीच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्याचा सर्वे आरोग्यसेवक,आरोग्यसेविका,आशा, वर्कर,अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका,यांच्या कडून दररोज करण्यात येत असल्याची माहिती सरपंच मासाळ यांनी दिली.
या आरोग्य सर्वेमध्ये घरातील व्यक्ती किती दिवसापासून आजारी आहे,नवीन आणि बाहेर गावाहून कोण आले आहे का? तसेच कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घेण्यासाठीचे आवाहन या वेळी या सर्वे टीम कडून केले जात आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, मदतनीस आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांना प्रत्येकी पन्नास कुटुंबाचा सर्वे पूर्ण करण्याची जबाबदारी दिली असून 696 घरांचा पंधरा जणांच्या टीम मार्फत हा सर्वे केला जात आहे.तीन हजार 554 लोकसंख्या असणाऱ्या या गावात कोणीही बाहेरून आला तर त्याची तात्काळ माहिती ग्राम नियंत्रण समितीला देण्यात यावी असे आवाहनही यावेळी ग्राम नियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी सरपंच दत्तात्रय मासाळ,उपसरपंच चंद्रकांत चौगुले, ग्रामसेवक पठाण भाऊसाहेब,तलाठी घाडगे मॅडम, पोलीस पाटील रवींद्र पाटील,आरोग्य सेवक संजय वाघमारे, आरोग्यसेविका कीर्ती पवार आदी उपस्थित होते.
0 Comments