शहरातील गर्दी कमी करण्यासाठी सांगोला नगरपरिषदेचा अनोखा "त्रिरंगी पास" उपक्रम
कुटुंबातील एकच व्यक्ती आठवड्यातून फक्त 2 वेळेसच घराबाहेर पडू शकेल
सांगोला(प्रतिनिधी) सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वांनी आता खबरदारी घेणे गरजेचे आहे. प्रशासना मार्फत वेळोवेळी आवाहन करून सुध्दा शहरातील नागरिक किराणा,भाजीपाला, मेडिकल इत्यादी करिता गर्दी करत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे शहरातील ही गर्दी कमी करण्यासाठी सांगोला नगरपरिषदेने *"त्रिरंगी पास"* चा नामी उपक्रम सुरू केला आहे.
यात नगरपरिषदेमार्फत शहरात प्रत्येक कुटुंबातील प्रमुखास एका रंगाचा पास दिला जाईल. या पास ला विशिष्ट रंग असेल आणि त्यावर 2 वारांची नावे असतील. या पास वर जे दोन वार लिहिलेले असतील त्याच दिवशी घराबाहेर खेरीदी साठी बाहेर पडतात येईल आणि तेही कुटुंबातील फक्त एकच व्यक्तीला.यामुळे शहरातील गर्दी कमी होण्यास फार मदत मिळेल.
पिवळा,गुलाबी व निळा असे तीन रंगाचे पास असून पिवळ्या रंगाचे पास धारक कुटुंब प्रमुख सोमवारी,गुरुवारी तर गुलाबी रंगाचे पास धारक कुटुंब प्रमुख मंगळवारी,शुक्रवारी आणि निळ्या रंगाचे पास धारक कुटुंब प्रमुख बुधवारी,शनीवारी खरेदीसाठी घराबाहेर पडू शकतील.
या पास चा उपयोग घरातील इतर व्यक्तींना करता येणार नाही. तसेच नेमून दिलेल्या वारा व्यतिरिक्त बाहेर फिरताना आढळून येणाऱ्या व्यक्तींवर तसेच अश्या नियम मोडून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना सामान देणाऱ्या दुकानदारांवर देखील कडक कारवाई केली जाईल.
जर आज किराणा,भाजीपाला आदींची खरेदी पूर्ण झाली तर पुढचे 2 दिवस परत घराबाहेर पडण्याची गरज नाही त्यामुळे हा उपक्रम किराणा, भाजीपाला आदींच निम्मंत करून फेरफटका मारणाऱ्यांना आवर घालण्यास फार उपयोगी ठरेल अशी आशा आहे.
शहरातील गर्दी कमी व्हावी आणि पर्यायाने गर्दीमधून होणारा विषाणू संसर्ग टाळता यावा यासाठी ही *"त्रिरंगी पास योजना"* सुरू केली आहे. शहरातील सर्व नागरिकांनी आठवड्यातून नेमून दिलेल्या 2 दिवशी च घराबाहेर पडावे व अनावश्यक गर्दी टाळावी.- कैलास केंद्रे,मुख्याधिकारी,सांगोला नगरपरिषद
कोरोना ची लढाई जिंकायची असेल तर सामाजिक अंतर राखणे गरजेचे असून या त्रिरंगी पास उपक्रमाच्या माध्यमातून शहरात होणारी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सर्व नागरिकांनी आपल्या सांगोला शहरास कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी आपणास पास वर नेमून दिलेल्या दिवशीच घराबाहेर पडून सहकार्य करा- राणिताई माने, नगराध्यक्षा, सांगोला नगरपरिषद
*Pass चा रंग आणि नेमून दिलेले वार:*
सोम/गुरू---- *पिवळा*
मंगल/शुक्र- - *गुलाबी*
बुध/शनी-- - *निळा*
0 Comments