Hot Posts

6/recent/ticker-posts

आष्टी तलावात उजणीचे पाणी सोमवारी सोडण्यात येणार- रामदास चवरे

आष्टी तलावात उजणीचे पाणी सोमवारी सोडण्यात येणार!
रामदास चवरे यांची माहिती

माजी आ.राजन पाटील, आ.यशवंत माने, बाळराजे पाटील यांचे विशेष प्रयत्न



मोहोळ,( प्रतिनिधी):मोहोळ तालुक्याच्या हरितक्रांती साठी वरदायिनी असलेल्या आष्टी तलावामध्ये दि.२६ मे रोजी माजी आ. राजन पाटील, आ. यशवंत माने, लोकनेते शुगर चे अध्यक्ष बाळराजे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून उजनीचे पाणी सोडण्यात येणार असून याद्वारे आष्टी उपसा सिंचन डावा व उजवा कालवा द्वारे शेतीसाठी आणि पिण्याच्या  पाण्यासाठी ते सोडण्यात येणार असल्याची माहिती पेनूरचे उपसरपंच रामदास चवरे यांनी दिली.

मोहोळ तालुक्यातील येवती येथे असलेल्या आष्टी तलावांमधून मोहोळ,माढा,पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.परंतु आष्टी तलावामध्ये पाणी कमी झाल्याने उजनी धरणाचे पाणी आष्टी तलावात सोडून ते पाणी आष्टी उपसा सिंचन योजनेमध्ये सोडण्यासाठी माजी आ. राजन पाटील, आ. यशवंत माने व लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यानुसार दि.२६ मे रोजी आष्टी तलावामध्ये उजणीचे पाणी सोडण्यास सुरवात होणार  आहे.आष्टी तलावमधून हे पाणी आष्टी उपसा सिंचन योजनेच्या उजवा व डावा कालवा द्वारे शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे.पावसाने ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पिकांची पाण्याची अडचण दूर होणार असल्याचेही यावेळी रामदास चवरे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाभाऊ सलगर,चेतन टेकळे,देवानंद चवरे,सुधाकर धांडे,अमर माने,विठ्ठल सावंत,सुधीर मांदे,नंदकुमार माने,नागेश लोंढे,अरबाज आतार,रोहित जाधव,लखन माने,श्रीकांत शेंबडे,सोहेल आतार आदी लोक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments