Ads

Ads Area

सोलापुरात अडकलेल्या युवक युवतींची आ.प्रणिती शिंदे यांनी विशेष बस ला झेंडा दाखवून केरळ ला केले रवान

रोजगारानिमित्त सोलापुरात आलेल्या लॉकडाऊन मुळे अडकलेल्या केरळ येथील युवक युवतींची काँग्रेस पक्षाच्या वतीने जाण्याची व्यवस्था, आमदार प्रणिती शिंदे यांनी विशेष बस ला झेंडा दाखवून केरळ ला रवाना केलेसोलापूर -केरळ राज्यातील पल्लकड कोट्टायम येथील युवक, युवती रोजगारानिमित्त सोलापुरात आले होते. लॉक डॉऊन मुळे सोलापुरात अडकले होते. हे सर्व रोजगारानिमित्त आलेले युवक युवती ग्लाज़ ट्रेडिंग इंडिया प्रा. लि. महात्मा इंटरप्राईज यांच्यामार्फ़त सोलापुरात रोजगारानिमित्त आले होते या प्रत्येकडून पंधरा हजार रुपये ही घेण्यात आले होते. लॉक डाऊन सुरु झाल्यानंतर कंपनीने यांना वाऱ्यावर सोडले होते. यांचे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल होत होते. गेल्या दोन महिन्यापासुन कधी एकदा घरी जातो म्हणून वाट पाहत होते. अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेस चे महाराष्टाचे सचिव मॅथु अँटनी, श्रीमती लेखा नायर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून या युवक युवतींची केरळ ला जाण्यासाठी सोय करण्यात आली. युवक युवतींना घेऊन जाणाऱ्या विशेष बस ला आज रोजी आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा दाखवुन केरळ ला रवाना करण्यात आले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे तुमचा प्रवास सुखी होवो च्या शुभेच्छा दिल्या यावेळी सोलापूर महानगर पालिकेचे  नगरसेवक विनोद भोसले, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, शाहु सलगर, गिरीश स्वामी , सचिन चव्हाण, दौला शेख, बसवराज कोळी, सौरभ साळुंखे उपस्थित होते.

या विशेष बसमध्ये 25 युवक युवती सदर बसमध्ये प्रवास करीत असून केरळ राज्यातील पल्लकड कोट्टायम जिल्ह्यात त्यांना पोहोचविण्यात येणार आहे. त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी अडीच दिवसाचा अवधी लागणार आहे. 

महाराष्ट प्रदेश काँग्रेस समिती व ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस, आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक विनोद भोसले  , गिरीश स्वामी, परिवहन सदस्य तिरुपती परकीपडलं, यांच्या विशेष प्रयत्नामुळे रोजगारासाठी आलेल्या युवक युवतींना सोलापूर शहरातून केरळ राज्यात प्रवासासाठी परवानगी, आरोग्य तपासणी व इतर आवश्यक बाबीसाठी सहाय्य करण्यात आले.  प्रवासात त्यांच्याकरीता भोजनाचे पॅकेटस व पिण्याच्या पाण्याची सुविधाही पुरविण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घरापासुन दूर असलेल्या रोजगारानिमित्त आलेल्या युवक युवतींना घरी जायला मिळत आहे म्हणून आनंदात दिसत होते. या युवक युवतींनी काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close