Ads

Ads Area

सांगोला तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग कोमात, अवैध दारू धंदे मात्र जोमात

सांगोला तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग कोमात, अवैध दारू धंदे मात्र जोमात



सांगोला (प्रतिनिधी) :- कोरोनाने अवघ्या जगाला वेढले आहे. जगण्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आधी कोरोनापासून दूर राहण्याची काळजी प्रत्येकजण घेताना दिसतो आहे. यात समाजातील कोणताच घटक मागे नाही. प्रत्येक जण कोरोनाच्या लढाईत आपली आपले कर्तव्य करीत आहे.सांगोला तालुक्यातील आरोग्य विभाग,महसूल विभाग,पोलीस प्रशासन विभाग, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत, आणि याच काळात मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र कोमात असल्याचे  जनमानसातुन बोलले जात आहे.
      सांगोला तालुक्यातील काही गावात  लॉक डॉऊन कालावधीत अवैध दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने जोमात आणि खुलेआम सुरू आहे.दारू विक्रेते चढ्या दराने विक्री करत आहेत. सांगोला तालुक्यात कार्यरत असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उप विभागाचे कार्यालय नावापुरतेच असून संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मात्र डोळ्याला पट्टी बांधून शांत आहेत,अवैध दारू विक्री बंद करून तालुक्यात शांतता राखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्य करावे,अशी मागणी सामान्य जनतेतून केली जात आहे. त्यामुळे  अशा कार्यकर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून डॅशिंग अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी अनेक सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांतून केली जात आहे.
    ऐन लॉक डाऊन च्या कालावधीत सांगोला तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था उत्कृष्ठपणे ठेवण्याचे कार्य पोलीस निरीक्षक राजेश गवळी आणि त्यांची टीम बजावीत असताना, अवैध दारू विक्रीवर बंदी घालण्याचे कार्य राज्य उत्पादन विभागाचे असताना हा उपविभाग मात्र कोमात असल्याचे दिसून येत आहे. सांगोला पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यावर अनेक ठिकाणी धाडी टाकून गुन्हे दाखल केले आहेत. मात्र राज्य उत्पादन विभागाला मात्र पोलिसांच्या या कामगिरीचे सोयर सुतक नसल्याचे दिसून येत आहे.

 सांगोला तालुक्यातील पारे गावात अवैध दारू ,शिंधी विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे.पारे गावच्या शेजारील हंगिरगे ,घेरडी ,जवळा ,हबिसेवाडी ,डिकसळ ,नराळे ,येळवी ,भोपसेवाडी ,गावडेवाडी ,हुन्नर ,वायफळ, निगडी इत्यादी जवळजवळ वीस गावातील लोक दारू पिण्यासाठी फक्त आणि फक्त पारे गावात येत आहे .आणि हे सर्व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे होत आहे.
    विशेषतः १४० रुपयांना मिळणारी विदेशी दारूची बाटली आज ५०० रुपयांना विकली जात आहे. तर ५२ रुपयांना मिळणारी देशी दारूची बाटली २५० रुपयाला विकली जात आहे.याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र "'तेरी भी चूप मेरी भी चूप" या भूमिकेत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात सुरू असून येणाऱ्या काळात तर हा विभाग लोकांच्या हितासाठी अवैध दारू विक्री करणाऱ्यांर कारवाई करणार का ??असा सवाल जनमानसातून उपस्थित केला जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close