Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला तालुक्याची डोकेदुखी वाढली ; वाकी घेरडी येथील एकास हलविले पुढील उपचारासाठी सोलापूरला

सांगोला तालुक्याची डोकेदुखी वाढली ; वाकी घेरडी येथील एकास हलविले पुढील उपचारासाठी सोलापूरला

रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांना घरामध्ये आसरा देऊ नये-- प्रांताधिकारी उदयसिंह भोसले



सांगोला ( जगन्नाथ साठे) वाकी घेरडी  ता- सांगोला येथेे दिनांक 20 मे रोजी मुंबई जोगेश्वरी येथून एक इसम आलेला होता. सदर इसमास काल दिनांक 22मे रोजी ताप, डोकेदुखी,बोलताना घसादुखी, श्वसनास त्रास होत असल्यामुळे आज दिनांक 23 मेे 2020 रोजी सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले  असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. सदर  इसमाच्या संपर्कात  आलेल्या दोन व्यक्तींना घरात विलगीकरण करण्यात आलेले आहे. तर एका व्यक्तीस वाकी घेरडी येथील शाळेत अलहिदा संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे. पर जिल्ह्यातून किंवा परराज्यातून येणाऱ्या विशेषतः यातील रेड झोन मधून येणाऱ्या लोकांना आपल्या घरामध्ये कोणत्याही स्वरूपात आसरा देऊ नये तसेच असे काही लोक जर आपणास आढळून आले तर अशा लोकांची माहिती प्रशासनास देण्यात यावी जेणेकरून सदर व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करता येईल. त्यामुळे जर एखादा बाधित रुग्ण आढळून आला तर भविष्यात होणारा संभाव्य समूह प्रादुर्भाव रोखता येईल असे आवाहन  उदयसिंह भोसले उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी केले आहे आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments