घराचं रणांगण फक्त कौरवांनी केले होते, आज संकट काळात कौरवांची भूमिका भाजप सरकार पार पडत आहे : डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील
सांगोला प्रतिनिधी : म्हणतात ना की घराची कळा अंगण सांगते, म्हणून अंगणाच महत्त्व घराच्या पावित्र्या इतक असतं, मेरा अंगण मेरा रणांगन ही टॅगलाईन ठेवून भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. अशा प्रकारे सरकार विरोधी आंदोलन करून भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी नेमके कोणते हित साध्य करत आहेत. खऱ्या अर्थाने राजकारण आणि विरोध करण्याची ही वेळ नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं होतं. असा टोला लगावत घराचं रणांगण फक्त कौरवांनी केले होते. आज संकट काळात कौरवांची भूमिका भाजप सरकार पार पडत असल्याची टीका युवा नेते डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, शिवसेना आणि कॉंग्रेस यासह इतर महाआघाडीतील पक्षाच्या वतीने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. लोकांना अन्नधान्याची मदत केली जात आहे. मास्क, सनीटायझरिंगचे वाटप केले जात आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन करून रुग्णांना मदतीचा हात दिला जात आहे. काही ठिकाणी फ्रुट पॅकेज वाटप केले जात आहे. आणि भाजपचे कार्यकर्ते आज अंगणात उभा राहून आंदोलन करीत आहेत. सर्वांनी एकत्रित येऊन या विषाणूपासून नागरिकाला वाचवण्याची खरी गरज आहे. परंतु काळे झेंडे घेऊन भाजप सरकार व त्यांचे कार्यकर्ते राजकारण डोळ्यासमोर ठेवून वागत आहेत. खरं तर ही वेळ राजकारण करण्याची नाही. हे त्यांनी समजायला हवं आहे.
कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर्स, पोलीस, वकील, पत्रकार, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस, सफाई कर्मचारी यासह इतर अनेक नागरिक रात्रंदिवस आपल्या रक्ताचे पाणी करून जीवाची परवा न करता कोरोनाशी लढा देत आहेत. यापैकी अनेक पोलिस कर्मचारी व डॉक्टरांना याची लागण झाली तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आजही अनेक रुग्ण कोरोनामुळे जीवन मृत्यूशी झुंज देत आहेत. परंतु याचे कोणतेही देणे-घेणे या भाजप सरकला व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना नाही. केवळ आगामी हेतू डोळ्यासमोर ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा डाव या विरोधी सरकारकडून व त्यांच्या कार्यकर्त्याकडून केला जात आहे. सध्याची परिस्थिती ही आंदोलन करण्याची नाही. मेरा अंगण मेरा रणांगन ही टॅगलाईन ठेवून भाजपने केलेले आंदोलन सध्याच्या परिस्थितीत योग्य नाही. तर महामारी पासून राज्याला व जिल्ह्याला तसेच आपल्या तालुक्याला बाजूला काढण्यासाठी व सुरक्षित ठेवण्यासाठी एकोप्याने लढा देण्याचे आहे. राजकारण नंतर करता येईल सध्या आलेले संकट दूर करण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जावून सर्वांनीच पुढाकार घ्यावा अशी टीका वजा सल्ला युवा नेते डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील यांनी भाजपला आणी त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिला आहे.
ReplyForward
|
0 Comments