Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज ग्रा.पं.च्या १५ टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप- शिवतेजसिंह

अकलूज ग्रा.पं.च्या १५ टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तुंचे वाटप- शिवतेजसिंह


अकलूज : कोव्हीड १९ अर्थात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशात, राज्यात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकांचे रोजगार बंद आहेत. अनेकांना तर उदरनिर्वाह करण्यासाठी अन्नधान्य ही उपलब्ध करणे शक्य नसल्याचे दिसत आहे. अशातीलच गरीब, होतकरू, कष्टकरी मागासवर्गीय कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून अकलूज ग्रामपंचायतच्या वतीने १५ टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू करण्यात आले असल्याची माहिती सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवशंकर बझारच्या अध्यक्षा स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  यापूर्वीच श्री आनंदी गणेश सेवाभावी संस्थेच्या वतीने किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील व शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी अकलूज परिसरातील सुमारे ३५०० पेक्षा अधिक कुटुंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे. परंतु अजुनही चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू असल्याने अनेकांना रोजगार उपलब्ध होत नाही. हातावर पोट असणार्‍यांना आपला उदरनिर्वाह करता यावा या जाणिवेतून सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी ग्रामपंचायतच्या १५ टक्के निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरीकांकडून स्वागत होत आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी सुधाकर मुंगूसकर, कार्यालयीन अधिक्षक बाळासाहेब वाईकर, सुनिल काशिद उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments