खासगी दवाखान्यातून खबरदारी घेत रुग्णसेवा द्या
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश
सोलापूर, दि. २5 :- सोलापूर जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत खाजगी हॉस्पिटल, नर्सिंग होम, ओपीडी खाजगी मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यवसायिक आणि आरोग्यविषयक खाजगी आस्थापना सुरू ठेवून कोरोना खबरदारी घेत वैद्यकीय सेवेची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना सेवा द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले आहेत.
त्यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, की वैद्यकीय सेवेच्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांत सेवा सुरू ठेवावे. यासाठी कार्यवाही करीत असताना कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. खाजगी हॉस्पिटल नर्सिंग होममध्ये रुग्णांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालयातील दोन रुग्णांतील अंतर तीन फुटांपेक्षा जास्त असावे. रुग्णालयात विषाणू संसर्ग संक्रमित होणार नाही याची विशेष काळजी घेऊन त्या प्रकारची व्यवस्था करावी. विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओपीडी मध्ये रुग्णांचे विषयासंदर्भात प्रबोधन करण्यात यावी असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सदरचे आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था संघटना कलम 188 कायदेशीर कारवाईस पात्र असेल. अशा व्यक्ती व संस्था संघटना यांच्या विरुद्ध सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आरोग्याधिकारी सोलापुर महापालिका आणि जिल्ह्यातील ग्रामीण भाग व नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रात तालुका आरोग्य अधिकारी यांनी कारवाई करावी, असे श्री. शंभरकर यांनी आदेशात नमूद केले आहे.
1 Comments
Nice ..Information Anilji
ReplyDelete