संत रोहिदास महाराज समाज सहाय्यक मंडळ पंढरपूर यांच्यावतीने गरजूंना अत्यावश्यक साहित्याचे वाटप संपन्न
पंढरपूर- संत रोहिदास महाराज समाज सहाय्यक मंडळ पंढरपूर यांच्यावतीने गरजूंना अत्यावश्यक साहित्याचे वाटप संपन्न झाले.या मध्ये गरजू,निराधार,विधवा, तृतीयपंथी अशा गरजूंना 5की गव्हाचा आटा,1की साखर,1की पोहे,1मोठा संतूर साबण,1कपड्याचा साबण, व्हील पावडर पुडा,चहा पावडर,मटकी डाळ,तुर डाळ,1की शेंगदाणे,1की गोडे तेल,मास्क आशा एकूण 12 जीवनावश्यक वस्तूंचा एक संच असे एकूण 55 गरजूंना संस्थेचे खजिनदार श्री.तानाजी साळे,व्यवस्थापक श्री.अंकुश राऊत,श्री.राजेंद्र शिंदे,श्री.शंकर आगावणे,श्री.कांबळे सर, डॉ.श्रीमती.उगले मॅडम यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळी या मंडळाने योग्यवेळी मदतीचा हात दिल्याने चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.वाटप करण्यासाठी अंकुश राऊत यांच्या संपूर्ण कुटुंबाचे मोलाचे सहकार्य लाभले.मंडळाच्या कार्यकर्त्यांचा व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून दुसऱ्या टप्प्यात असेच पण मोठ्या प्रमाणात वाटप करण्याचा संस्थेचा मानस आहे.या वेळी सुरक्षित आंतर ठेऊन व निर्जंतुकीकरण करणे याची विशेष काळजी घेण्यात आली.या मंडळाची पंढरपूर येथे काही महिन्यांपूर्वीच इमारत पूर्ण झाली असून पहिलेच नावाप्रमाणे समाज सहाय्यक कार्य सुरू झाल्याने अनेकांनी मनापासून संस्थेला शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments