Hot Posts

6/recent/ticker-posts

डॉ. धवलसिंह यांनी दिले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन

डॉ. धवलसिंह यांनी दिले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन

धान्य व तेल, चहा, साखर, डाळी मोफत देणे बाबत व प्रत्येक वार्डात जाऊन वाटप करण्याची केली मागणी   




अकलूज ( प्रतिनिधी ):- शासनाने गहु,तांदळ याबरोबर तेल चहा ,साखर व डाळी मोफत देणेबाबत व सदर वस्तु प्रत्येक वार्डात जाऊन वाटप करणेची मागणी
डॉ धवलसिंह मोहीते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  व उप-मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
                संपूर्ण  भारतात कोरोना व्हायरस मुळे लाॅकडाऊन केले आहे या परिस्थितीत गोरगरिब जनतेचे अत्यंत हाल होत आहे छोटे छोटे उद्योग धंदेवाले चहा टपरी, वडापाऊ ,रिक्षाचालक,असे अनेक लोकांना  हाताला काम नसल्यामुळे आणी जवळचे पैसे संपल्यामुळे अनेक कुटुंबे अन्नापासुन वंचित राहत आहेत  मोलमजुरी करणारे लोकांना धड रोजगार हमीवर पण कामाला जाता येत नाही यामुळे अशा लोकांचे तर भयंकर हाल होत आहेत.
आमचे जनसेवा संघटना व अशा अनेक सामाजिक संघटना आपले आपले परिने मदत करित आहेत पंरतु सर्व लोकांना मदत करने शक्य नाही आणी त्यांची परस्थितीही नाही. आपले महाराष्ट्राला अनेक थोर संताची परंपरा आहे असेच सन 1376 ते 1378 सलग तिन वर्ष दुष्काळ भयंकर पडला होता त्यावेळी संत दामाजी यांची मंगळवेढ्याच्या मामलेदारपदी नेमणूक झाली होती 1376 मध्ये भयंकर दुष्काळ पडला. पुन्हा 1377 सालीही पाऊस पडला नाही. त्या पुढच्या 1378 सालीपण भीषण दुष्काळ पडला. जनता हवालदिल झाली.होती  त्यावेळी लोकांचे हाल पाहुन दामाजीपंतांनी धान्याने भरलेली ती कोठारे लोकांसाठी खुली केली हा इतिहास आहे आजसुद्धा  तिच परस्थिती आहे फक्त  आता दुष्काळा ऐवजी लोकांची  लाॅकडाऊन आहे
लोकांची काम करायची इच्छा असुनही काम करू शकत नाही. 
       महाराष्ट्र राज्यामध्ये संताच्या विचाराचे सरकार आहे  व आपले सारखे संवेदनशील मुख्यमंत्री त्याचे नेतृत्व करित आहात  महाराष्ट्रातील थोर संताचे परंपरेनुसार महाराष्ट्र शासनाने या परस्थितीत वरिल सर्व बाबीचा संवेदनशील मनाने विचार करून महाराष्ट्रातील सर्व गोरगरिब  जनतेला मदत म्हणुन गुह,तांदुळ याबरोबरच तेल चहा,साखर,व डाळी या वस्तु लाॅकडाऊन  कालावधीत पुरेल इतके मोफत वाटप करावे अशी विनंती आपणास करित आहे  तसेच सदर धान्य व साहित्य वाटप हे त्या त्या भागामध्ये जाऊन वाटप करणेची व्यवस्था करावी म्हणजे गरजु माणसाला लाभ मिळेल व भ्रष्टाचार होणार नाही तरी वरिल बाबीचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घेणेबाबतचे निवेदन उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व उप-मुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचेकडे डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते पाटील यांनी दिले आहे. तर सदरचे निवेदन व पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य,पालक मंत्री सोलापुर जिल्हा, जिल्हाधिकारी सोलापुर जिल्हा, प्रांताधिकारी सो  अकलुज विभाग,
तहसीलदार सो माळशिरस तालुका, यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments