Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरात आणखी एक कोरोना रुग्ण ; एकूण रुग्ण १३ ...

 सोलापुरात आणखी एक कोरोना रुग्ण ; एकूण रुग्ण १३ ...

सोलापुरातील कोरोना बाधिताची संख्या आता आज 1 ने वाढून 13 झाली आहे.
 यातील 12 जणांवर उपचार सुरू आहेत  तर एक जणाचा रविवारीच मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शुक्रवारी सायंकाळी ही माहिती दिली.

पाच्छा पेठेत गेल्या रविवारी एका किराणा दुकानदाराचा कोरोना मुळे मृत्यू झाला होता. यानंतर  त्याच्याशी संबंधित 149 जणांना ताब्यात घेऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. यात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह मिळाली होती . त्यानंतर या महिलेशी संबंधित आणखी काही जणांना ताब्यात घेऊन आरोग्य तपासणी केली, तेव्हा तब्बल 10 जण कोरोना बाधित आढळून आले.
       आता या 10 जणांशी संबंधित  अनेक जणांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी सुरू आहे.

आत्तापर्यंत सोलापुरात कोरोना चाचणीसाठी 646 जणांचे स्वॅब घेण्यात आले .यातील 486 जणांचे अहवाल आज सायंकाळपर्यंत प्राप्त झाले आहेत . यात 473 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आज ज्या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे, तो ठाणे येथून 15 तारखेला सोलापुरात आला होता. रविवार पेठ परिसरात आपल्या निवासस्थानी थांबला. तिथे त्रास वाढल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो दाखल झाला .त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

 या रुग्णाची  माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रविवार पेठेतील सर्व वस्त्यांना जाणारे रस्ते बंद केले आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अनेक जणांना तपासणीसाठी ताब्यातही घेतलं आहे.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे . विनाकारण भटकणाऱ्या अनेक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आजवर  जिल्ह्यात 7500 वाहन जप्त करण्यात आली आहेत.

गोदुताई विडी घरकुल येथील कोरोना विषयक प्रबोधन करणाऱ्या एका महिलेच्या दोन्ही वाहनांना आग लावल्या प्रकरणी वळसंग पोलिसांनी तिघाजणांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.  हा प्रकार आज पहाटे घडला होता.
Reactions

Post a Comment

0 Comments