सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी दिले सोलापूर जिल्ह्यातील पहिले स्वॅब कलेक्शन किट
अकलूज ( प्रतिनिधी ) - कोव्हीड 19 अर्थात कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचा घटक असणार्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी निरनिराळी किट उपलब्ध असली तरी पेशंटचा आणि डॉक्टरांचा थेट संपर्क होऊ नये या उद्देशाने अकलूज ग्रामपंचायतीचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी कोव्हीड व्हिस्क नामक स्वॅब कलेक्शन किट अकलूज च्या उपजिल्हा रूग्णालयास उपलब्ध करून दिले आहे.
सुदैवाने अकलूज व पर्यायाने माळशिरस तालुक्यात अद्याप एकही कोरोना पॉझीटीव्ह रूग्ण आढळला नसला तरी प्रांतअधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, माळशिरस पंचायत समिती, तहसिल कार्यालय, सर्व पोलिस स्टेशन, आरोग्य यंत्रणे द्वारे सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यातही अकलूज ग्रामपंचायतीने अधिक सजगता दाखवून भाजी मंडई च्या ठिकाणी सॅनीटायझर, हॅण्ड वॉश किट, ब्लोअर मशीनच्या सहाय्याने संपूर्ण गावात औषध फवारणी, कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी पत्रके वाटप, भाजीपाला, किराणा, फळे, दूध अशा प्रकाच्या जिवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा अशा विविध उपायोजनाची प्रभावी अंमलबजावणी करून अकलूज पॅटर्नची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
याच धर्तीवर संशयीत कोरोना रूग्णाची तपासणी करण्यासाठी त्याचे स्वॅब घेतले जातात. हे स्वॅब घेताना संबंधित डॉक्टरांना त्याचा प्रादुर्भाव होऊ नये या काळजीने सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी स्वॅब कलेक्शन किट म्हणजेच कोव्हीड व्हिस्क अकलूजच्या उपजिल्हा रूग्णालयात उपलब्ध करून दिले आहे. या किटच्या माध्यमातून संबंधित डॉक्टर या किटच्या आतमध्ये जाऊन बाहेर थांबलेल्या पेशंटचे स्वॅब घेऊ शकणार आहेत. यामुळे डॉक्टरांना याची लागण होण्याचा धोका ना च्या बरोबरीने असणार आहे. स्वॅब घेतल्यानंतर ते तपासणीसाठी सोलापूर येथून पाठवण्याची व्यवस्था उपजिल्हा रूग्णालयामार्फत केली जाईल. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील नागरीकांनी कोरोना संशयित रूग्णांचेे स्वॅब तपासणी ला पाठविण्यासाठी अकलूजच्या उपजिल्हा रूग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments