Hot Posts

6/recent/ticker-posts

उद्योग वाचले तर ढासळलेली अर्थव्यवस्था मजबूत होईल : रणजितसिंह मोहिते-पाटील

 उद्योग वाचले तर ढासळलेली अर्थव्यवस्था मजबूत होईल
                रणजितसिंह मोहिते-पाटील      
          

अकलूज ( प्रतिनिधी ) - राज्याच्या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यात दुध व साखर उद्योगाचा सिंहाचा वाटा आहे . कोरोनामुळे ही अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे . हे उद्योग वाचले तरच  ढासळलेली अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होइल .त्यासाठी या उद्योगांकडे अधिक लक्ष द्यावे अशी मागणी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे  . 
कोरोना व्हायरसमुळे राज्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटावर विचार विनीमय करण्यासाठी  राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरंसीद्वारे   राज्यातील प्रमुख नेत्यांशी संवाद साधला . त्यावेळी रणजितसिंह मोहीते पाटील यांच्याशी त्यांनी संवाद साधुन लॉकडाउन  काळातील सहकार व अन्य क्षेत्रातील अडचणींचा आढावा घेतला. 
                 या वेळी रणजितसिंह मोहीते पाटील यांनी, लोकडाउनच्या काळात सहकारी व खासगी साखर कारखानदारी अडचणीत आलेली असुन साखर कारखाण्यांकडे मोठ्या प्रमाणात साखर पडुन आहे .  दळणवळणाच्या अडचणींमुळे साखर उचलण्यासाठी व्यापारी उपलब्द होत नसल्याने ती उचलली जात नाही तर ती साखर फुड काॅर्पोरेशन आॅफ इंडीयाने विकत घेतली पाहीजे. ज्या कारखाण्याकडे ईथेनाॅल उपलब्द आहे ते इथेनॉल  कार्पोरेशन आॅफ इंडीयाने विकत घेवुन ते स्टोअर करुन ठेवले पाहीजे अशा सूचना त्यांनी केल्या .

       शासनाने  सहकारी दुध संघाकडील अतिरीक्त दुधाची दुध पावडर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आज ग्रामीण भागात खासगी दुधसंस्थांची संख्याही  मोठी आहे . पण या अडचणीच्या काळात सहकारी व खासगी दुध संस्थाकडे अतिरीक्त दुधाची विल्हेवाट लावण्याची सोय नाही त्यामुळे दुध उत्पादक शेतकर्यांना मिळणारा  दुधाचा भाव पडला आहे . शेतकर्यांकडुन खासगी दुध संस्था१५ ते २०रुपये लिटर प्रमाणे  दुध खरेदी करत आहेत त्यामुळे ऐन अडचणीच्या काळात दुध उत्पादक शेतकर्यांच मोठं नुकसान होत आहे. त्यासाठी शासनाने  सहकारी  दुध संस्थांकडुन दुध खरेदी करुन त्यापासुन देखील दुध पावडर बनवली पाहीजे . जी आपत्कालीन परीस्थितीमधे उपयोगाला येईल.आज शेतकर्यांच्या शेतमालाला भाव नाही .  लोकडाऊन मुळे शेतकरी पुर्णतः कोलमडला आहे.उदाहरणा दाखल आज मका या पीकाचा हमीभाव १७६० रुपये प्रति क्विंटल असताना ती १३००-१४०० रुपये प्रतिक्किंटल दराने खरेदी केली जात आहे . यातुन शेतकऱ्यांचे मोठे  नुकसान होत असुन त्यासाठी शेतकर्यांच्या  शेतमालाला  हमीभाव मिळावा व   आपत्कालीन परीस्थितीमधे शेतमाल खरेदी विक्रीसाठी राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने आॅनलाईन खरेदी विक्री ॲप  बनवले पाहीजे ज्याचा लाभ शेतकर्यांसाठी होवु शकेल असंही मोहिते पाटील यांनी सांगितले.
           आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात असंघटीत कामगारांची संख्या जास्त प्रमाणात आहे.कामगार मंत्रालयाकडे यासंदर्भात निधीही उपलब्द आहे त्याचा या अडचणींच्या काळात उपयोग होऊन असंघटीत कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न सोडवला पाहीजे.आशा प्रकारचे प्रश्न जे शेतकरी, कामगार यांच्या दैनंदिन जिवनाशी निगडीत आहेत त्या प्रश्नांकडे बोट दाखवत ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागले पाहीजेत अशी मागणी रणजितसिंह मोहीते पाटील यांनी व्हिडीओ काँफरंन्सीग दवारे देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेदवारे केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments