Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला - मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची मटण मार्केट ला अचानक भेट

सांगोला - मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची मटण मार्केट ला अचानक भेट

सांगोला प्रतिनिधी) - सांगोला शहरात कोरोना विषाणू चा शिरकाव होऊ नये यासाठी सांगोला नगरपरिषदेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अश्यातच आज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी अचानक मटण व चिकन मार्केट ला भेट देऊन तेथील स्वच्छता, विक्रेत्यांकडून सॅनिटीझर चा वापर, social distancing यांचा आढावा घेऊन विक्रेत्यांना सक्त सूचना केल्या. त्यांनी यावेळी विक्रेत्यांना अंगावरील कपडे रोज धुण्याचा,सॅनिटीझर चा वापर करण्याचा व स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याच आवाहन केलं.
        तसेच पाणीपुरवठा विभागास मटण मार्केट ला जास्त वेळ पाणीपुरवठा करण्याबाबत सूचना केल्या. व मटण विक्रेत्यांना देखील पाणी साठवून ठेवण्याकरिता टाक्या खरेदी करण्याचे आदेश दिले जेणेकरून सर्व मटण मार्केट ची स्वच्छता राखणे शक्य होईल.
Reactions

Post a Comment

0 Comments