कोरोनाच्या लढाईत साथ देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे ऋण कधी ही न विसरता येणारे- डॉ.विजय बंडगर
यशोदा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बंडगर कुटूंबियाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सांगोला (जगन्नाथ साठे) सध्या देश कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करत आहे. सर्वत्र संचारबंदी आहे,लॉक डॉऊन चा कालावधी असल्याने रुग्णाची अहोरात्र सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे ऋण कधी ही विसरता येणार नाहीत, आज प्रत्येक जण या आजाराला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करीत आहे,याच कालावधीत यशोदा हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या नर्सेस,मावश्या,स्लीपर,चालक,वर्षभर सेवा देणारे इलेक्ट्रीशियन,प्लम्बर,आदि कर्मचाऱ्यांना बंडगर कुटुंबीयाकडून दि -२१ एप्रिल रोजी जीवनावश्यक वस्तुंचे किट डॉ विजय बंडगर,सौ.उर्मिला बंडगर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या वेळी डॉ विजय बंडगर म्हणाले की,अहोरात्र रुग्णांची देखभाल करणारे आरोग्य कर्मचारी हेच डॉकटरांचे खरे सहकारी म्हणून ओळखले जातात. याच कर्मचाऱ्यांमुळे हॉस्पिटल नावारूपाला येत असते.वर्षभर सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांची आजच्या काळातील सेवा महत्वपूर्ण असून कोरोनाच्या या लढाईत त्यांचे ही योगदान महत्वपूर्ण आहे.त्यांना बंडगर हॉस्पिटल कडून एक छोटीसी मदत म्हणून हॉस्पिटल मध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येकाला सामाजिकतेचे भान ठेवून दहा किलो गहू,पाच किलो तांदूळ, एक किलो तेल,एक किलो साखर,एक किलो तूर डाळ,साबण,शेंगदाणे एक किलो,मीठ,हळद,बिस्कीट पुडा,सॅनिटायझर, आदि जीवनावश्यक वस्तूचे किट दिले आहे, नक्कीच सर्वांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करून कोरोनाला हद्दपार करू असा आशावाद या वेळी डॉ विजय बंडगर यांनी व्यक्त केला. सदर जीवनावश्यक किटचे वाटप करताना सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.
सदर किटचे वाटप करताना श्रीपती बंडगर, सौ.बबुताई बंडगर,डॉ.विजय बंडगर,सौ.उर्मिला बंडगर,करण बंडगर,स्नेहल बंडगर,डॉ.आदित्य बंडगर,आणि कर्मचारी वृंद उपस्थित होता.या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे बंडगर कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments