मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 10 हजार कुटुंबांना 1 कोटी रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटपचा शुभारंभ संपन्न
सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडून गोर गरीब कुटुंबांना महा मदत
सांगोला- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉक डाऊनमुळे घरामध्ये अडकून राहिलेल्या गोरगरीब व गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी व त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लावण्यासाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा. सुप्रियाताई सुळे, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष जयंतजी पाटील यांच्या प्रेरणेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आम.दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातुन सुमारे 1 कोटी रुपये खर्च करुन परंपरेनुसरा दुष्काळी असलेल्या सांगोला मतदार संघातील 10 हजार कूटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ सोमवारी जवळा तालुका सांगोला येथे करण्यात आला. यावेळी जवळा व परिसरातील 1 हजार गोरगरीब गरजू कुटुंबांना या कीटचे वाटप करण्यात आले. सांगोला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून गरीब कुटुंबांना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वत्र लॉक डाऊन व संचार बंदीचे आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व उद्योग, व्यवसाय - व्यापार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आले आहे. या काळात अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला , सर्वत्र गरजू व गरीब कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले जाणार आहे.
सांगोला तालुक्यातील जवळा येथे या कीट वाटपाचा शुभारंभ करून येथील गोरगरीब गरजू कुटुंबांना दिलासा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून करण्यात आला आहे. लवकरच गाव पातळीवरील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मार्फत प्रत्येक गाव वाड्या वस्त्या वरील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष तानाजीकाका पाटील यांनी सांगितले आहे.
0 Comments