निरंकारी मंडळाच्या वतीने अकलुज परीसरातील
गरजुना धान्य व जिवनावश्य वस्तु घरपोच
अकलुज ;लाँकडाऊन मुळे हाताल काम नाही त्यामुळे रोजदारी करुन उदरनिर्वाह करणारे अनेक कुठुंबापुढे अडचणी येत असतानाच संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा अकलुज यांच्या वतीने अकलुज व परीसरातील गरजु कुठुबांना चांगल्या प्रतिचे धान्य व जिवनावश्यक वस्तु घोरपोच देवुन मानवतेचा धर्म जोपासण्यात आला.
सध्या कोरोनोच्या साथीने थैमान घातले असून जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारने लाँकडाऊन केल्याने सर्व कामे थांबली आहेत.दररोज रोजदारी करुन उपजिवीका करणाऱ्याना काम नसल्याने त्याच्या उपजिवेकेस अडचण येत आहे.संत निरंकारी मंडळ दिल्ली या अध्यात्मिक मिशनच्या प्रमुख सदगुरु सुदीक्षा महाराज यांनी अडचणीत असलेल्या परीवारांना अत्यावश्यक वस्तु घरपोच करण्यासाठी निरंकारी मंडळाच्या सर्व शाखाना सुचित केले आहे.संत निरंकारी मंडळ शाखा अकलुज यांच्या वतीने याआदेशानुसार अकलुज व परीसरातील गरजुना गहू,तांदुळ,साखर,दाळ व तेल या जिवनावश्यक वस्तु घरपोच देवुन मानव सेवेत योगदान दिले.अकलुज शाखा कार्यक्षेत्रातील अकलुज सह माळशिरस,वेळापुर,निमगाव,बोंडले, माळीनगर, महाळुंग गर नं २,र्श्रीपुर,बोरगाव,यशवंतनगर,गि रझणी येथे निरंकारी मंडळाच्या सेवादल मार्फत घरपोट साहीत्य पोहच करण्यात आले.अत्यंत अडचणीच्या वेळी जिवनावश्यक वस्तु घरपोच मिळाल्याने फार मोठा आधार मिळाला असल्याच्या भावना यावेळी लोकाःनी व्यक्त केल्या.
यावेळी अकलुज शाखेचे प्रमुख मारुती साळवे, विनायक माने,संचालक दिलीप कांबळे,मिडीया सहाय्यक नागेश लोंढे,अजिक्य माने आदीसह सेवादल उपस्थित होते.

0 Comments