Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आढावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील केलेल्या भागाचा
उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आढावा



पुणेदि.७:कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव पाहता पुणे शहरातील  काही भाग प्रशासनाने सील करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला.
बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरपुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्पुणे महानगर पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाडपुणे जिल्हाधिकारी नवल किशोर रामपिंपरी - चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकरपोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवेअपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदेपिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची उपस्थिती होती.
शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोंढवा तसेच महर्षीनगर ते आर. टी. ओ. कार्यालयापर्यंतचा जुन्या पेठांचा भाग काल मध्यरात्रीपासून सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. सील केलेल्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आधिक आहे. त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनाही संसर्ग होण्याच्या शक्यतेने प्रशासन याबाबत अधिक सक्रिय झाले आहे. सील केलेल्या भागातील नागरिकांनी संचारबंदीचे आदेश पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. या सील केलेल्या भागातील दूधभाजीपालागॅसऔषधे आदिंचा पुरवठा सुरु राहील. परिसरातील स्वच्छता गृहेगल्लीबोळ निर्जंतुकीकरण करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. डॉक्टरअत्यावस्थ रुग्णअत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना यातून सूट मिळेल.
परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचेसंभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नयेयासाठी स्वयंसेवी संस्था पोलीस विभागातर्फे समुपदेशन करुन प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची भावना लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे,अशा स्वरुपाच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.
Reactions

Post a Comment

0 Comments