जिल्हा परिषद शिक्षक श्री.दिनेश क्षीरसागर यांचा अनोखा उपक्रम......." - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2020

जिल्हा परिषद शिक्षक श्री.दिनेश क्षीरसागर यांचा अनोखा उपक्रम......."

जिल्हा परिषद शिक्षक श्री.दिनेश क्षीरसागर यांचा अनोखा उपक्रम......."

 
                           प्राथमिक शिक्षक दिनेश क्षीरसागर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हत्तरसंग,तालुका दक्षिण सोलापूर  याठिकाणी कार्यरत आहेत.त्याच बरोबर ते सोलापूर जिल्हा मागासवर्गीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत.कोरोनाच्या दुष्प्रवाहामुळे सध्यस्थितिला सर्व शाळेतून मुलांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत.या धर्तीवर मुलांना सुट्टीच्या काळात अभ्यासाची गोडी लागावी व सर्वात महत्वाचे मुलांना घरातच गुंतून ठेवण्यासाठी क्षीरसागर यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या इयत्ता तिसरी वर्गाचा व्हाट्स अँप ग्रुप  दिनांक 17 मार्च 2020 रोजी तयार केलाआहे.विशेष म्हणजे लॉक डाऊन होण्याआगोदरच त्यांनी जवळ जवळ 23 पालकांचे व्हाट्स अँप नंबर घेऊन "इयत्ता तिसरी गुणवत्ता कक्ष नावाचा ग्रुप तयार केला आहे.त्यावर DP हा माता सावित्री माई फुले यांचा लावला आहे.या ग्रुपच्या माध्यमातून मुलांना दररोज सर्व विषयांचा अभ्यास दिला जातो.विद्यार्थी आपला केलेला अभ्यास फोटो काढून ग्रुप वर टाकतात.शिक्षक हा सर्व अभ्यास तपासून त्यात झालेल्या चूका मुलांना अवगत करून देतात व त्याची दुरुस्ती करण्यास सांगतात.या उपक्रमाने हत्तरसंग गावातील सर्व पालक व नागरिकांनी खूप समाधान व्यक्त केले.गावातून त्यांचे खूप कौतुक होत आहे.
 ‌                         त्याच बरोबर गेली दोन वर्षे ते आणखी एक उपक्रम राबवित आहेत.क्षीरसागर यांनी एक फॉरमॅट फॉर्म स्वतः तयार केला आहे.तो फॉर्म ते वर्गातील प्रत्येक मुलाला देतात, यात पालकाचे आपल्या पाल्याच्या अभ्यासविषयी अभिप्राय आणि सुधारणा स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून द्यायच्या आहेत.प्रत्येक पालकांनी दिलेला अभिप्राय व सुधारणा होण्यासाठी त्यांनी मांडलेले मत यावर क्षीरसागर यांनी उपाय योजना करून गुणवत्तवाढीस चालना दिली आहे.याबद्दल ही सर्व ग्रामस्थांमधुन त्याचे कौतुक होत आहे.या उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी बनसोडे साहेब त्याचबरोबर विस्ताराधिकारी स्वामी मॅडम तसेच केंद्रप्रमुख सदरखेड साहेब यांनी ही त्यांचे विशेष कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages