विद्यार्थी व लेखक गेली पंधरा दिवस करत आहेत गरिबांना अन्न पुरवठा. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, April 12, 2020

विद्यार्थी व लेखक गेली पंधरा दिवस करत आहेत गरिबांना अन्न पुरवठा.

विद्यार्थी व लेखक गेली पंधरा दिवस करत आहेत गरिबांना अन्न पुरवठा.

बार्शी (प्रतिनिधी)-  आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन बार्शी तालूका कौन्सिल विद्यार्थी संघटना व प्रगतिशील लेखक संघ, सोलापूर जिल्हा लेखकांची संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखन्याठी केलेल्या लॉक डाउन काळात गरिब, श्रमजीवी जनतेला सन्मानपूर्वक शिजवलेल्या अन्नाचा पूरवठा घरपोहच करण्याचे काम बार्शी शहरात गेले 15 दिवस केले जात आहे.  हा उपक्रम शहिद भगतसिंग व कॉम्रेड गोविंद पानसरे यांना आदर्श ठेवून पूढे नेहला  जात आहे.
अधिक माहिती अशी की, रोज एक वेळ 130 ते 150 गरिब जणांना शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा सन्मानपूर्वक करण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनी पॉकीट मनीतून सूरू केलेल्या उपक्रमाला प्रगतिशील लेखकांनी साथ दिली आहे. या उपक्रमासाठी विद्यार्थी व लेखक यांची आॅनलाईन बैठक घेत आॅनलाईनल पैसे गोळा केले.  काही दानशुर व्यक्तींकडून धान्य, भाजीपाला व रोख पैसे अशी मदत घेण्यात आली आहे.  यात अखिल भारतीय किसान सभा, अनिसच्या पदाधिकार्यांनी देखील सहकार्य केले. 14 एप्रिल 2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून हा उपक्रम थांबवला जाईल. देश संकटाच्या काळात असताना कोरोना सारख्या महामारी सोबत दोन हात करण्यासाठी गरिब, कष्टकरी,  श्रमजिवींची सेवा करत, देशातील जनतेच्या कामी यावे हा स्पष्ट उद्देश ठेवला असल्याचे विद्यार्थी व लेखक सांगतात.
मोफत स्वयंपाक करून देण्याची जबाबदारी राणी शिंदे, रेखा वायकर, आशा शिंदे, राधा शिंदे, सिता व्हनकळस, राणी वीर, सुरेखा व्हनकळस, तारामती कांबळे, ऋतूजा सूतार, पूजा कांबळे, कलावती व्हनकळस, अंजली विर, कांचन वीर, सोनाबाई मस्तुद, सुदिप्ता हवालदार, नंदा लोकरे यांनी स्विकारल्याने हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
 प्रा. तानाजी ठोंबरे व प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेल्या या उपक्रमाला कॉ. भारत पवार, प्रा. डॉ. दत्तात्रय घोलप, कॉ. पवन आहिरे, प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. डॉ. भारती रेवडकर, यश वायकर, प्रशांत शिंदे, सौरभ शिंदे, आतूल कांबळे, ओंकार गोणेकर, बेलेश्वर वीर, बाबासाहेब व्हणकळस, अजिंक्य होनकळस, प्रा. डॉ. ए.बी. कदम, प्रेमसागर राउत, प्रा. डॉ. रविकांत शिंदे, प्रा. रमेश शिंदे, प्रा. डॉ. संजय कारंडे, अविराज चांदणे, बिभीषण शिंदे, गणेश शिंदे, आयाज शेख, तूषार कांबळे, प्रविण मस्तुद हे परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages