शेतकरी कामगार पक्षाचा गरजूंना मदतीचा हात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, April 12, 2020

शेतकरी कामगार पक्षाचा गरजूंना मदतीचा हात

शेतकरी कामगार पक्षाचा गरजूंना  मदतीचा हात

सांगोला शहरातील सातशे कुटुंबांना दिले जीवनावश्यक वस्तुंचे किट.


सांगोला (जगन्नाथ साठे) : सध्या जगात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने सर्वसामान्य भयभीत झाले आहेत, त्यातच देशात संचारबंदी आणि लॉक डॉऊन असून ज्यांचे हातावर पोट आहे, अशा गरजूं लोकांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माजी आमदार डॉ गणपतराव देशमुख, युवा नेते चंद्रकांत देशमुख, युवक नेते डॉ अनिकेत देशमुख यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सांगोला शहरात सुमारे सातशे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंचे किट देण्यात आले.
      सध्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे लॉक डॉऊन मुळे जगणे मुश्किल झाले असून अशा गरजू लोकांना शेकापच्या वतीने सांगोला शहरातील प्रभाग क्र चारमधील धनगरगल्ली, तेली गल्ली, इंदिरानगर झोपडपट्टी, कैकाडी गल्ली , गोंधळी गल्ली, बुरुड गल्ली, आदि ठिकाणी दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो साखर , साबण आदि साहित्याचे किट दिले.या वेळी नगरसेवक सुरेश माळी, प्रा. संजय शिंगाडे, प्रा. बंडोपंत येडगे, संपादक मोहन मस्के, शफी इनामदार, अनिल शिंगाडे, रामचंद्र जानकर, अरुण शिंगाडे, सुरेश टेळे, हणमंत साठे, महेश चौधरी, सदाम बागवान, सोमनाथ टेले,  आदि मान्यवर उपस्थित होते.
     माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे विनंतीवरून   चार दिवसांपूर्वी बाजार समिती आवारात राहणाऱ्या पवार कुटुंबीयांचे घर शॉर्ट सर्किट मुळे जळून मोठे नुकसान झाले होते.उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला ही शेकाप च्या वतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. सांगोला शहरातील सर्वच प्रभागात हा उपक्रम चालू असल्याचे शेकाप पदाधिकाऱ्यानी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages