वाराणसी येथून आलेले ते सात जण "इन्स्टिट्यूट कॉरंटाइन" मध्ये--प्रांताधिकारी उदयसिंह भोसले.
नागरिकांनी घरा मध्ये थांबावे, प्रांताधिकारी भोसले यांचे आवाहन.
सांगोला (जगन्नाथ साठे) वाराणसी(उत्तर प्रदेश) येथून दिनांक १६ एप्रिल रोजी पहाटे सांगोला येथे आलेले ते सात जण कोरोनाच्या दक्षते साठी इन्स्टिट्यूट कॉरंटाइन मध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. सांगोला तालुक्यातील पाचेगाव (खु) येथील सहा जण तर मानेगाव येथील एक जणांचा यामध्ये समावेश आहे. वाराणसी येथून आपल्या मूळ गावी येण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून ते आपल्या मूळ गावी परत आले असल्याची माहिती ही यावेळी उदयसिंह भोसले यांनी दिली.
सध्या देशभर लॉक डॉऊन असून संचार बंदी आहे.या मुळे परराज्यातून आलेल्या या नागरिकामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. त्यातच सोलापूर येथे एकदम दहा जण कोरोना ग्रस्त आढळून आल्याने जिल्ह्यासह तालुक्यात ही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या वेळी आपत्ती व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता आणि कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे, सर्व नागरिकांनी घरातच थांबावे, परजिल्हा,परराज्यातून आलेल्या नागरिकांची तात्काळ माहिती आरोग्य विभागास द्यावी,जेणेकरून लवकरात लवकर त्या नागरिकांची आवश्यक ती चाचणी करण्यात प्रशासनाला मदत होईल. तालुक्यात आलेल्या त्या सात जणांची प्राथमिक स्वरूपाची वैद्यकीय चाचणी केली असून त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नाहीत,सुरक्षतेचा उपाय म्हणून "त्यांना इन्स्टिट्यूट कॉरंटाइन मध्ये"ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले असून नागरिकांनी घाबरून न जाता जागरूकपणे,योग्य ती काळजी घेवून प्रशासनास सहकार्य करावे, आरोग्य विभागाचे पथक आणि गावातील सनियंत्रण समिती या लोकांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती ही या वेळी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
आज आमच्या गावात आलेले सहा नागरिक हे वाराणसी येथून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून आले आहेत.त्यांना इन्स्टिट्यूट कॉरंटाइन मध्ये ठेवण्यात आले असून गावपातळीवरील सनियंत्रण समिती योग्य ती देखभाल करत आहे,नागरिकांनी योग्य ती काळजी घेवून प्रशासनास सहकार्य करावे
--रामचंद्र मिसाळ (सरपंच पाचेगाव खु)

No comments:
Post a Comment