भिवंडीतून कर्नाटकात निघालेल्या मजुरांवर कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, April 16, 2020

भिवंडीतून कर्नाटकात निघालेल्या मजुरांवर कारवाई

भिवंडीतून कर्नाटकात निघालेल्या मजुरांवर कारवाई

टेंभुर्णी : - ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून कर्नाटक राज्यातील शहापूर येथे तीन पिकअप टेम्पोमधून निघालेल्या ५५ लोकांना टेंभुर्णी पोलिसांनी पकडून त्यांच्यावर रीतसर कारवाई केली असून नंतर या सर्व लोकांना जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई बुधवारी दि.१५ एप्रिल रोजी दु.४ वा. सुमारास भिमानगर येथील चेक पोष्टवर करण्यात आली.
याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लागू केलेल्या बंदी आदेशाचे पुणे-सोलापूर महामार्गावरून पोना.दत्तात्रय कैलास गोसावी,पोकॉ.बाळराजे चंद्रकांत घाडगे,चालक पोकॉ.खंडागळे हे पालन पोलीस करण्यासाठी वाहनातून पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बुधवारी दु.०४ वा. सुमारास भिमानगर येथील चेक पोष्ट वरून माहिती मिळाली की,ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून तीन पिकअप टेम्पोतून अनेक लोकं छुप्या पद्धतीने कर्नाटक राज्यात निघालेले आहेत.या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांना घेऊन जाऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी.

यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्वांना ताब्यात घेऊन टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आणले असता पिकअप टेम्पो (क्र-एम.एच.०४-के.एफ-०५१४) मध्ये चालक सुभाष शंकर राठोड (वय-२५) रा.शहापूर जि.यादगिरी,कर्नाटक.हल्ली रा.भिवंडी हा १३ जणांना व ६ लहान मुलांना घेऊन निघाला होता.तर पिकअप टेम्पो (क्र-०४-के.एफ-१३०१) मध्ये चालक देवराज जयराम जाधव (वय-२४) रा.वरील प्रमाणे हा १५ लोकांना घेऊन निघाला होता.तसेच पिकअप टेंम्पो (क्र-एम.एच-०४-जे.यु-०१२०) मधून चालक अनिल लालू चव्हाण (वय-२२) रा वरील प्रमाणे हा २१ जणांना घेऊन कर्नाटक राज्यात शहापूर जि.यादगिरी येथे प्रत्येकी एक हजार रुपये भाडे घेऊन जिल्हाबंदी आदेश असताना व कोणताही परवाना नसताना बंदी आदेशाचे उल्लंघन करून  सोडायला निघाले असल्याचे निष्पन्न झाले.
यामुळे याबाबत पोना दत्तात्रय कैलास गोसावी व पोकॉ.बाळराजे चंद्रकांत घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून त्यांच्यावर कलम १८८ व मोटार वाहन कायदा कलम ६६(१) १९२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली  सपोनि राजेंद्र मगदूम,पोहेकॉ अभिमान गुटाळ,पोकॉ.प्रसाद काटे,पोना.भोसले यांनी  केली असून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व लोकांची रवानगी मोहोळ   तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ विद्यालयातील शेल्टर होममध्ये करण्यात आली आहे.
टेंभुर्णी पोलिसांची माणुसकी : -टेंम्पोत बसून लोकांची झालेली अवस्था,उपासमार पाहून टेंभुर्णी पोलिसांनी माणुसकीच्या भावनेतून सर्वांना पाणी,चहा,केळी देऊन आपल्यातील माणूस जागा असल्याचे दाखवून दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages