कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवायचे असेल तर प्रशासनास सहकार्य करा-- गटविकास अधिकारी संतोष राऊत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2020

कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवायचे असेल तर प्रशासनास सहकार्य करा-- गटविकास अधिकारी संतोष राऊत


कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवायचे असेल तर प्रशासनास सहकार्य करा--  गटविकास अधिकारी संतोष राऊत 




सांगोला (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील विविध गावात परदेश, परराज्य तसेच पुणे मुंबई व इतर शहरातून नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊन आले आहेत. अशा नागरिकांचा सर्व्हे आरोग्य विभागामार्फत यापूर्वीच करण्यात आला असून जवळपास सतरा हजार नागरीक तालुक्यातील विविध गावात आल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र यापैकी कोणालाही कोरोना रोगाची लक्षणे अद्याप दिसून आली नाहीत, ही समाधानाची बाब आहे.
तथापि सांगोला तालुक्याच्या शेजारी असणाऱ्या सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्वच कुटुंबाची सर्व्हे करून पाहणी करण्याचे नियोजन सांगोला पंचायत समितीने केले आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी संतोष राऊत यांनी दिली.
या सर्व्हे मध्ये गावातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका व मदतनीस घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची नोंद घेणार आहे. त्यापैकी एखादी व्यक्ती बाहेर गावातून आली असेल तर ती किती दिवसांपूर्वी गावात आली आहे, याचीही नोंद घेण्यात  येणार आहे. तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप यापैकी काही लक्षणे दिसतात का, याचीही नोंद घेण्यात येणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्व्हे ची माहिती रोजच्या रोज ऑनलाईन भरली जाणार आहे. सदर माहिती ऑनलाईन भरण्याचे काम  ग्रामपंचायत च्या आपले सरकार सेवा केंद्राचे केंद्र चालक करणार आहेत.
गावपातळीवर सदर सर्व्हे च्या सनियंत्रणाची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत च्या ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवकांवर देण्यात आली आहे.
तसेच तालुका स्तरावरून सदर सर्व्हे बाबत मार्गदर्शन करणे, ग्रामपंचायत कडूनअहवाल जमा करणे याबाबतची जबाबदारी 9 विस्तार अधिकारी व 5 अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर देण्यात आली आहे, असे गट विकास अधिकारी संतोष राऊत यांनी सांगितले.
गावातील पदाधिकाऱ्यांनी सर्व्हे बाबत पुढाकार घ्यावा, कोणतीही व्यक्ती माहिती लपवणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, तसेच नागरिकांनी सुद्धा माहिती देणेबाबत सहकार्य करावे, असे आवाहन गट विकास अधिकारी यांनी केले आहे. कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवायचे असेल तर प्रशासनास सहकार्य करा, काही लक्षणे दिसत असल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क करा, असेही राऊत यांनी सांगितले.
पंचायत समिती सांगोला येथे तालुका आरोग्य अधिकारी सीमा दोडमनी, सहाय्यक गट विकास अधिकारी विकास काळूखे व बाल विकास प्रकल्प अधिकारी असमा आतार हे संयुक्तपणे या सर्वेक्षणाचे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages