आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं ; संजय राऊतांची मोदींवर टीका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 3, 2020

आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं ; संजय राऊतांची मोदींवर टीका

आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं ; संजय राऊतांची मोदींवर टीका






मुंबई-| लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोक ढोल वाजवत रस्त्यावर आले. आता आग लावली नाही म्हणजे झाल, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री 9 वाजता संपूर्ण देशवासियांना मेणबत्या आणि दिवे पेटवण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या या आवाहनावर विरोधकांनी टीका केलेली असतानाच शिवसेनेनेही पंतप्रधानांच्या आवाहनाची खिल्ली उडवली आहे.

रविवारी रात्री 9 वाजता तुम्ही तुमच्या घरातील सर्व लाइट्स बंद करा. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा. हे 9 मिनिटं करा, असं आवाहन मोदींनी आज देशवासियांना केलंय.

संजय राऊत यांनी ट्विट करून ही खोचक टीका केली आहे. तसेच साहेब, कामाचं बोला आणि लोकांच्या पोटापाण्याचं बोला, असं आवाहनही संजय राऊत यांनी मोदींना केलं आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages