ऑनलाईन क्लासेसचा शिवरत्न पॅटर्न- शितलदेवी मोहिते - पाटील
अकलूज( प्रतिनिधी ) - कोरोना संकटाच्या काळात लाॅकडाऊन मध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा काॅलेजस बंद ठेवण्यात आलेली आहेत. या परीस्थिती मध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये त्यांच्या अभ्यासावर परीणाम होऊ नये या करीता अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरत्न शिक्षण संस्था संचलीत "शिवरत्न पॅटर्नच्या" NEET JEE परीक्षा देणा-या विद्यार्थ्यां करीता ऑनलाईन क्लासेस द्वारा मार्गदर्शन सुरू केले आहे.
शिवरत्न पॅटर्न अकलूज मधील NEET ,JEE च्या सर्व विद्यार्थ्यांच्या करीता आपले फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलाॅजी साठीचे आॅनलाईन क्लासेस द्वारा मार्गदर्शन सुरू केलेले आहे. दि. १ एप्रिल २०२० पासून आपणास दिलेल्या क्राॅश कोर्स शेड्युल नुसार आॅनालाईन क्लासेस सुरू होणार आहेत. अशी माहिती शिवरत्न पॅटर्न द्वारे शितलदेवी मोहिते पाटील यांनी दिली.
शिवरत्न पॅटर्न मध्ये NEET JEE करीता एकूण १६४ विद्यार्थी असुन घरबसल्या ऑनलाईन क्लासेसचा लाभ घेत आहेत. शिवरत्न पॅर्टनच्या विविध नामांकित तज्ञ शिक्षकांचे व्हीडीओ काॅन्फरस द्वारा ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे. तसचे ऑनलाईन सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सुरू केलेल्या ऑनलाईन क्लासेसच्या उपक्रम सुरु केल्या बाबत विद्यार्थी व पालकांच्या कडून या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करणेत येत आहे.
0 Comments