सहयाद्री फार्मसी महाविद्यालयाच्या ऑनलाईन स्टडी वर्क फ्रॉम होम उपक्रमाचे विद्यार्थी व पालकांकडून कौतुक
कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण जगात या कोरोना कोवीड 19 या विषाणूने धुमाकुळ घातला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊन चा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्व शाळा व महाविद्यालये पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात खंड पडला यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील यांच्या मार्गदर्शक सुचनेनूसार सर्व प्राध्यापक वृंदाने विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अभ्यासक्रम पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानूसार सर्व प्राध्यापक वृंदांनी विविध ऑनलाईन अभ्यासक्रम प्रणाली जसे की, गुगल क्लासरुम व इतर ऑनलाईन टिचिंग मोडयुल्स व टुल्सचा वापर करुन सर्व विद्यार्थ्यांना अभ्सासक्रमाविषयी माहीती देणे, प्रश्न चाचणी घेणे, व्हीडीओद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शंकेचे निरसण करणे, त्यांना अभ्यासासंबंधित सर्व इ. पुस्तके, पीडीएफ, पीपीटी व नोट्स माहीती संग्रह पाठवले. याबरोबरच महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू प्रादूर्भावबद्दल जनजागृती करुन विद्यार्थ्यांना व पालकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले या उपक्रमाचे सर्व पालक व विद्यार्थीवर्गातून कौतुक होत आहे.
0 Comments