नाझरे येथे गरीब गरजूंना किराणामाल वस्तूंचे वाटप
कोरोना संकटामुळे अनेक कुटुंबांच्या रोजीरोटी चा प्रश्न निर्माण झाला आहे,अशा स्थितीत गोरगरिबांच्या मदतीचा हात होऊन दानशूर नाझरेकरांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न केले आहेत,
नाझरे गावातील हातावरचं पोट असलेल्या गरीब व गरजू कुटुंबाना आर्थिक अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी किराणा वस्तूंचे वाटप केले.हे वाटप गावातील प्रतिष्ठित व्यक्तिच्या हस्ते करण्यात आले. गावातील दानशूर व्यक्तींनी जवळपास 4लाख 90हजार600 रुपये मदतनिधी जमा झालेली होती.त्यातून जीवनावश्यक वस्तूंचे किट गावातील 800 कुटुंबाना वाटप शुक्रवारी करण्यात आले.
वेळी हणमंत सरगर , सुनील चौगुले , दादासाहेब वाघमोडे , विजय गोडसे, सुनील बनसोडे ,अशोक पाटील, सुरेश काका चौगुले, सिधू चौगुले, मदन रायचुरे, सूर्यकांत आदाटे ,संजय बनसोडे, एकनाथ जावीर, विजय जावीर, शिवाजी सरगर नागेश रायचुरे, महालिंग पाटील, भागवत वाघमारे, रमेश पाटील, आनंदा बनसोडे, बसवेश्वर आदाटे, भागवत वाघमारे, पांडुरंग वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या वेळी(Social distancing ) चा नियम पाळून वाटप करण्यात आले.
0 Comments