Hot Posts

6/recent/ticker-posts

एखतपुर ग्रामपंचायतीच्या वतीने आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एखतपुर ग्रामपंचायतीच्या वतीने आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 


सांगोला (जगन्नाथ साठे)  :- एखतपुर ता- सांगोला येथे एखतपुर ग्रामपंचायतीच्या वतीने आणि गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गावातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या जीवनावश्यक वस्तू वाटप करतेवेळी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले,  सरपंच चांदणी फाळके,उपसरपंच दत्तू चव्हाण,ग्रामसेवक शंकर मेटकरी,पोलीस पाटील सतपाल चव्हाण,सुरेश नवले,संतोष तात्या नवले आदि मान्यवर उपस्थित होते.

    या वेळी गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करीत आहेत. गाव पातळीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्स ठेवून लोकांना जीवनावश्यक किट देण्यात आले. दानशूर व्यक्ती मध्ये  विठ्ठल इंगोले सर, पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले,बाबासाहेब कबाडे गुरुजी, महात्मा फुले प्रतिष्ठान एकतपुर, शहाजी इंगोले(ग्रामसेवक) शिवाजी इंगोले, धनंजय पाटील गुरुजी, सुखदेव रंदिवे,संजय नामदेव इंगोले, आदी दानशूर व्यक्तींने मदत केली. या वेळी गावातील 56 लोकांना या जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. या जीवनावश्यक वस्तू किटमध्ये दहा किलो गहू, पाच किलो तांदूळ, दोन किलो साखर,एक किलो तेल, एक साबण, एक किलो तूर डाळ,इ वस्तुंचे किट बनविले होते.सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments