पंढरपूर - प्रभाग क्र. 14 मधील दानशुर मंडळींचा गरजवंतांना लाभला मोठा आधार;गरजुंना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप
पंढरपूर (प्रतिनिधी):- कोरोना विषाणुच्या सावटाखाली संपुर्ण जगाचं जीवनमान विस्कळीत झालंय; देशात लॉकडाऊन असल्यामुळे हातावरचं पोट असलेल्या सर्वसामान्यांना शासनाकडून मदतीची घोषणा झालीय; परंतु शासनाची मदत मिळेपर्यंत अनेक सर्वसामान्य नागरिकांसमोर रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गरजु लोकांना अत्यावश्यक रेशनमाल आणि जीवनावश्यक वस्तुंचे वाटप प्रभाग क्रमांक 14 मधील दानशूर नागरिकांच्या वतीने आ. प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेविका सौ. अर्चना नवनाथ रानगट यांनी नुकतेच स्वखर्चातुन प्रभागातील मजुर कुटुंबियांना स्वखर्चातुन रेशन व अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा घरपोहोच केला होता. यानंतर त्यांनी प्रभागातील दानशुर मंडळींना मदतीचे आवाहन केेल होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवुन प्रभागातील अनेक नागरिकांनी फंड जमा केला.
आज रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला, मंगळवेढेकर नगर पंढरपूर येथे आज नगरसेविका सौ.अर्चना नवनाथ रानगट यांचे संकल्पनेतुन दुसर्या फेरीमध्ये आ. प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते प्रत्येक कुटुंबाला दहा दिवस पुरेल एवढे अत्यावश्यक साहित्याचे व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव सर, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, माजी नगरसेवक तुकारामअप्पा राऊत, नागेश सिंघण सर, आण्णा ऐतवाडकर, माजी नगरसेवक नारायण सिंघण, शहाजी रानगट, सावंत सर, ज्योतीराम गोडसे, संतोष डोंगरे, गणेश सिंघन आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी नवनाथ रानगट मित्र मंडळ, उन्नती परिवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेविका सौ.अर्चना नवनाथ रानगट यांनी आपल्या प्रभागामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती मोहीम राबविली, याचबरोबर लॉकडाऊन कालावधीत प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. या प्रभागात रोजगारासाठी आलेली अनेक परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहेत. याचबरोबर बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह हा बिगारी कामधंद्यावर अवलंबुन आहे. परंतु सध्या सर्वच कामं ठप्प असल्यामुळे अनेक कुटुंबांच्या दैनंदीन पोटापाण्याचा प्रशन निर्माण झाला होता. अशा कुटुंबास आधार देण्यासाठी नगरसेविका सौ.अर्चना रानगट यांनी प्रथम स्वखर्चाने अन्नधान्याचा पुरवठा केला व यानंतर प्रभागातील दानशुर मंडळींच्या सहकार्याने गरजु कुटुंबांना भरीव मदत केली.
प्रभागामध्ये सर्वत्र जंतुनाशकाची फवारणी केली आहे. याचबरोबर नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशी विनंती केली आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रभागातील कोणत्याही नागरिकास आवश्यक ती मदत केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. पांडुरंग कृपेने लवकरच कोरोनाचे संकट दुर होईल व लॉकडाऊन थांबेल. तरीसुध्दा या काळात नागरिकांनी कोणतीही अडचण असेल तर आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नगरसेविका सौ. अर्चना नवनाथ रानगट यांनी केले आहे.
0 Comments