महात्मा फुले व ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती बहुजनांनी घरीच साजरी करावी - विकासदादा धाईजे
अकलुज /प्रतिनिधी - कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने देशात लाॅकङाऊन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकङून गर्दी करणाऱ्यानवर कारवाई सुरू आहे.बहुजन समाजाने संविधानाचा आदर करत कायद्याच्या चौकटीतच राहयंच आहे.११ एप्रिल रोजी महात्मा फुले व १४ एप्रिल रोजी ङाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येकाने घरीच साजरी करावी असे आवाहन माळशिरस नगरीचे माजी सरपंच विकासदादा धाईजे यांनी सर्व बहुजन समाजाला केले आहे .
महामानवांच्या जयंती म्हणजे बहुजन समाजाचा उत्सवच असतो, दरवर्षी एप्रिल महिन्यात ३० एप्रिल पर्यत संपूर्ण माळशिरस तालुक्यात महात्मा फुले व ङाॅबाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होत आसतो.परंतु कोरोनोच्या साथीमुळे आपला देश संकृटात आहे,कोरोना व्हायरस चा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कङक उपाय योजना राबवल्या गेल्या आहेत तरी गर्दी टाळण्यासाठी सर्व बहुजन समाजाने महात्मा फुले व ङाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती घरामध्येच सर्व कुटुंबाने एकत्र येत प्रतिमा पूजन व बुध्द पूजा घेऊन साजरी करावी. जयंतीच्या निमीत्ताने या दिवशी गरजू व गरीब लोकांना अन्न धान्य वाटप करावे सध्या अशा बिकट परिस्थितीत देशात समाजा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे मात्र शिवराय ,फुले, शाहू आंबेडकर या महापुरूषांच्या विचाराची सरणीचा हा महाराष्ट्र आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता अशा विघ्नसतोषी लोकांचा हा ङाव हानून पाङेल तसेच लोकांनी अफवावर विश्वास न ठेवता , सोशल मिङीया पासुन दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे अहवानही धाईंजे यांनी केले आहे.कोरोना पासुन स्वतःचे,कुटुंबाचे,समाजाचे पर्याने देशाचे संरक्षण करणे हीच व गरजुच्या मदतीला उभे राहून मदत करणे हिच खरी आदरांजली या दोन महापुरूषांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने ठरेल असे व्यक्तव्य विकासदादा धाईजे बोलताना व्यक्त केले.
0 Comments